नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील रहिवासी असलेले प्रताप बळीराम बेंद्रे हे सुमुल डेअरीतील कर्मचारी होते. आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील गुजरात राज्यातील बाजीपुरा उड्डाणपुलाच्या खाली त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
सविस्तर वृत्त असे की नवापूर शहरातील रहिवासी प्रताप बळीराम बेंद्रे (वय.५२ ) हे बाजीपुरा येथील सुमुल डेरी येथे गेल्या १५ वर्षापासून कर्मचारी म्हणून काम करीत होते. ते मानसिक तणावात असताना आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील गुजरात राज्यातील उड्डाणपुलाच्या खाली त्यांचा मृतदेह आढळून आला. या बाबत त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळू शकले नाही. घटनास्थळी गुजरात राज्यातील वालोड पोलिसांनी पंचनामा केला.वालोड रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.








