नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा हा संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो . नंदुरबार जिल्ह्यात यापूर्वी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होवून जातीय दंगली झाल्या होत्या . यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील विभिन्न जाती जमातीतील काही समाज कंटकांचा समावेश होता नंदुरबार जिल्हा शांत ठेवणेसाठी अशा समाज कंटकांवर अंकुश ठेवणे आवश्यक होते . नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी तसेच गुन्हेगारांवर वचक रहावी याकरीता नंदुरबार जिल्ह्यातील एका गुन्हेगारी टोळीतील एकुण १६ इसमांना पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५५ च्या अधिकारान्वये नंदुरबार जिल्हा हद्दीतुन २ वर्षांसाठी हद्दपार केलेले आहे . हद्दपार करण्यात आलेले सर्व १६ इसम हे नंदुरबार शहरातील आहेत .
पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा कार्यभार स्वीकारल्यापासुन नंदुरबार शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणाऱ्या इसमांची माहिती घेवुन त्यांचेवर दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला असता नंदुरबार शहर व उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील काही आरोपीतांवर बेकायदेशीररीत्या टोळी निर्माण करुन शासकिय कामात अडथळा निर्माण करणे , मनाई आदेशाचे उल्लंघन करणे , गैरकायद्याची मंडळी जमवून जाळपोळ करणे , जातीय तेढ निर्माण करणे जातीय दंगल घडवून आणने इत्यादी कलमान्वये गुन्हे दाखल होते . त्याप्रमाणे अशा आरोपीतांवर कठोर प्रतिबंधक कारवाई करावी याबाबत पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांनी प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते . नंदुरबार शहर हद्दीत राहणाऱ्या टोळीतील १६ इसमांविरुध्द् शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहेत . त्यावरुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याकडून १ टोळीस हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाला . सदर हद्दपार प्रस्तावाचा पोलीस अधीक्षक शपी . आर . पाटील यांनी आढावा घेवुन प्रस्तावांची छाननी केला तसेच योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडून १६ इसमांना हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांनी दिले आहेत .
नंदुरबार जिल्ह्यातुन गोविंद यशवंत सामुद्रे ( टोळी प्रमुख ) रा . सिध्दार्थ नगर नंदुरबार, गोपी यशवंत सामुद्रे रा . सिध्दार्थ नगर नंदुरबार, आकाश रविंद्र अहिरे रा . आंबेडकर नगर नंदुरबार, विश्वजीत ऊर्फ बॉबी संजय बैसाणे रा . समता कॉलनी नंदुरबार, गौतम मंगलसिंग खैरनार रा . जुनी पोलीस लाईन नंदुरबार, भटु गोरख जाधव रा . मेहतर वस्ती नंदुरबार, शेखर रमेश जाधव रा . मेहतर वस्ती नंदुरबार, दिपक शामा ठाकरे रा . चिंचपाडा भिलाटी , नंदुरबार, मुकेश मधुकर ठाकरे रा . चिंचपाडा भिलाटी , नंदुरबार, अक्षय अनिल वळवी रा . चिंचपाडा भिलाटी , नंदुरबार, वंकर रतिलाल ठाकरे रा . चिंचपाडा भिलाटी , नंदुरबार, शंकर रतन ठाकरे रा . चिंचपाडा भिलाटी , नंदुरबार, सतिष ऊर्फ जिबला दिलीप वळवी रा . चिंचपाडा भिलाटी , नंदुरबार, सचिन शामा ठाकरे रा . चिंचपाडा भिलाटी , नंदुरबार, राकेश राजेश ठाकरे रा . चिंचपाडा भिलाटी , नंदुरबार, अंबालाल जयसिंग ठाकरे रा . चिंचपाडा भिलाटी , नंदुरबार यांना हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार आदेशाची अमंलबजावणी तातडीने करण्यात येत असुन हद्दपार इसमांनी आदेश प्राप्त झाल्यावर ४८ तासाचे आंत तातडीने जिल्हा हद्दीबाहेर निघुन जाणेबाबत आदेश देण्यात आले आहेत . तसेच हद्दपार इसमांनी नंदुरबार जिल्ह्यात येतांना पोलीस अधीक्षक , नंदुरबार व न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे . हद्दपार आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांचे विरुध्द् प्रचलीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल तसेच वरील १६ हद्दपार इसम नंदुरबार जिल्ह्यात कुठेही दिसून आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्ष , नंदुरबार येथे कळवावे असे पोलीस प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे .








