तळोदा l प्रतिनिधी
वनदावे व वनपटटेधारक शेतकरी वर्ग यांच्या प्रमुख मागण्या संदर्भात तळोदा प्रांत कार्यालय येथे आज मोर्चा निघणार असून याचे नेतृत्व आमदार राजेश पाडवी हे करणार आहेत.तरी वनपट्टेधारक,वनदावे धारक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा मोर्चा सकाळी 10 वाजता तळोदा येथील आमदार राजेश पाडवी यांच्या कार्यालयापासून ते प्रांत कार्यालय येथे जाणार आहे. आज दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आमदार कार्यालय तळोदा येथे शेतकरी वनपट्टेधारकानी मोठ्या संख्येंने उपस्थीत राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.








