Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सारंगखेडा येथील घोडे बाजारात २८० घोडे विक्रीतून १ कोटींची उलाढाल

team by team
December 20, 2021
in राज्य
0
सारंगखेडा येथील घोडे बाजारात २८० घोडे विक्रीतून १ कोटींची उलाढाल

सारंगखेडा l प्रतिनिधी
अश्व बाजाराने कोटीचा आकडा पार केला असून २८० घोडे विक्रीतून १ कोटी पाच लाखाची उलाढाल झाली आहे. एकूण बाराशे घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

गेल्या वर्षात कोरोनामुळे बंद असलेला घोडेबाजाराला यंदा शासनाने परवानगी दिल्याने सुरुवात झाली आहे. घोडे बाजाराच्या सुरुवातीपासून आतापर्यंत १८० घोड्यांची विक्री झाली आहे. अश्व बाजारात खरेदी विक्रीचा व्यवहारात जोमाने वाढ होताना दिसत आहे. त्यात सर्वात महागडा घोडा अकरा लाख रुपयांचा नुकरा प्रजातीचा घोडा विकण्यात आला आहे. तो कोल्हापूर जिल्ह्यातील बाळू मामा मठ मंदिर विश्वस्तांनी खरेदी केला आहे. घोडे बाजारात एकूण बाराशे घोड्याची आवक झाली आहे व आतापर्यंत १८० घोड्यांची विक्री झाली आहे. अशी माहिती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी दिली. कोट्यावधी रुपयांचे, लख लख चंदेरी व सोनेरी रूप प्राप्त असलेले अश्व या अश्वनगरीत सामील झाले आहेत. या घोड्यांची किंमत कोटींच्या घरात आहे. हे कोट्यवधी रुपयांचे घोडे घोड्यांच्या स्पर्धेचे सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. घोडे बाजारात अश्व सौंदर्य स्पर्धा व अश्व प्रदर्शन सारख्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धांसाठी घोडे व्यापारी लाखो करोडोच्या घोड्यानं प्रशिक्षण देत आहेत. त्यांची चाल, उंची, रंग, डोळे, पंचकल्याण, देवमन कंठ, मान, पाय या सगळ्यांचे बारिकीने निरीक्षण करण्यात येत असते त्या अनुषंगाने घोडे व्यापारी व मालक घोड्याना महत्वपूर्ण प्रशिक्षण देण्यात व्यस्त आहेत. अश्व सौंदर्य स्पर्धेमध्ये प्रामुख्याने राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब या राज्यांचा समावेश आहे.

एक लाखाहून अधिक अशवप्रेमीची घोडे बाजाराला भेट

गेल्या वर्षी कोरोनाने भयंकर रौद्र रुप धारण केले होते त्या कारणास्तव घोडे बाजार रद्द करण्यात आला होता . यंदा परंतु शासनाने कोविड १९ च्या अटी शर्तीने सशर्त परवानगी देण्यात आली आहे. भारतात अश्वप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. आतापर्यंत घोडेबाजारात १ लाखाहून अधिक अश्वप्रेमीनी घोडे बाजाराला भेट दिली आहे अशी माहिती चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

सव्वा कोटीचा जालन्याचा एलएक्स अश्व सारंगखेडा बाजाराचा ठरला सेलिब्रेटी

Next Post

तळोदा येथे वनदावे व वनपटटेधारक, शेतकरी यांच्या मागण्यासाठी आ. राजेश पाडवी यांच्या नेतृत्वात प्रांताधिकारी कार्यालयावर आज मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add