Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सव्वा कोटीचा जालन्याचा एलएक्स अश्व सारंगखेडा बाजाराचा ठरला सेलिब्रेटी

team by team
December 20, 2021
in राज्य
0
सव्वा कोटीचा जालन्याचा एलएक्स अश्व सारंगखेडा बाजाराचा ठरला सेलिब्रेटी

सारंगखेडा l प्रतिनिधी
जालन्याचा एलएक्स नावाचा अश्व सारंगखेडा अश्व बाजाराचा सेलिब्रेटी ठरला आहे. अश्व बाजारात सर्वाधिक महागडा अश्व असून त्याची किमंत सव्वा कोटी रुपये आहे. अश्व बाजारात अश्वशौकीनांचे लक्षवेधले आहे.
काळ झपाट्याने आणि वेगाने बदलतो आहे. पण प्राचीन काळपासुन ते आजच्या मर्सिडीज कारच्या युगातही दळणवळणाचे साधन असलेल्या घोड्यांबाबतचे आकर्षण कायम आहे. साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या आणि शोले पासून बाहूबली पर्यंतच्या विविध चित्रपटांसाठी घोडे आणि घोडदळ पुरविणाऱ्या सारंगखेडा घोडेबाजारात उच्चप्रतीच्या घोड्यांची खरेदी विक्री सुरू आहे. गेल्या दोन दिवसात १६० घोडे विक्रीतुन ६० लाखांची उलाढाल झाली आहे. अश्व बाजारात सेलिब्रेटी ठरलेला एलएक्स हा मारवाड जातीचा असून तो मजबुत हाडे असलेला पंचकल्याणी आहे. त्याची उंची ६५ इंची एवढी आहे. हेवी स्टक्चर, देवमण कंठ असलेला आशण आहे व शुभ अश्वांचे लक्षण आहे व असे विविध लक्षणे आहेत. त्याची किमंत एक कोटी २५ लाख रुपये आहे. जालना येथील अब्दुल सौदागार यांचा अश्व असून त्याने पुणे इक्वेस्टेरीयन मिल्क मध्ये दुसरा क्रमांक मिळविला होता. त्याचे वय ४ वर्ष असून एलएक्स नाव ब्रिटन चा एक राजा तो कधीही पराभव झालेला न होता त्याचे नाव एलएक्स होते. त्याच्या अनुसार या अश्वाचे नाव ठेवण्यात आले आहे. येथील घोडे बाजारात विशेषतः पंजाब, सिंध, काठेवाड, मारवाड तसेच गावरान घोडयाचा समावेश आहे. त्यात पांढऱ्या घोडयांची संख्या अधिक आहे. काही जण घोडेस्वारी, टांगा, लग्नसोहळ्यासाठी घोडे खरेदी करतात. काही जण रेसकोर्स, घोडेसवारी, अश्व प्रदर्शन, स्पर्धा तसेच चित्रपट चित्रीकरणासाठी, लष्करासाठी घोडे खरेदी केली जातात. काही शौकीन मंडळी हौसेखातर घोडे खरेदी करतात. अश्व बाजारात विविध भाषा, संभाषण यामुळे परिसर गजबजून गेला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मराठा समाजातर्फे मागणी

Next Post

सारंगखेडा येथील घोडे बाजारात २८० घोडे विक्रीतून १ कोटींची उलाढाल

Next Post
सारंगखेडा येथील घोडे बाजारात २८० घोडे विक्रीतून १ कोटींची उलाढाल

सारंगखेडा येथील घोडे बाजारात २८० घोडे विक्रीतून १ कोटींची उलाढाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add