Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहरातील गटार व रस्ता विकास कामांसाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सव्वा दोन कोटी मंजूर

team by team
December 20, 2021
in राजकीय
0
नंदुरबार शहरातील गटार व रस्ता विकास कामांसाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सव्वा दोन कोटी मंजूर

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील विविध भागातील गटार व रस्ता विकास कामांसाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत दोन कोटी २९ लाख ५९ हजार १०२ रूपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली असुन सभेत १५ विषयांना मंजुरी देण्यात आली.

नंदुरबार नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा प्रभारी नगराध्यक्ष रविंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवारी रोजी सकाळी ११ वाजेला पालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात घेण्यात आली . सभेच्या प्रारंभी सीडीएस बीपीन रावत यांच्यासह हेलिकॉप्टर दुर्घटनेतील शहीद व पालिकेचे उपनगराध्यक्ष मेहबूब कुरेशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली . नगरपरिषदेची सर्वसाधारण सभेत दि.३१ मार्च २०२२ अखेर एकत्रित मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम एकरकमी भरणार्‍या मालमत्ता धारकांना चालू वर्षाच्या मालमत्ता करात १० टक्के सूट देण्याच्या निर्णयास मुदतवाढ देण्यात आली.यावेळी सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त लिहितांना ज्या विषयावर चर्चा झाली ते लिहिणे अपेक्षित असल्याचे मत विरोधी नगरसेवक चारुदत्त कळवणकर यांनी व्यक्त केले . कोरोना कालावधीत गाळेधारकांना दुकान भाड्यात सूट देण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता . परंतु , त्यात सूट न मिळाल्याने गाळेधारकांना भाडे भरण्याच्या नोटिसा आल्याचे कळवणकर यांनी सभागृहात सांगितले . त्यावर मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे म्हणाले , जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठवला होता परंतु त्यास मंजुरी मिळाली नाही . त्यामुळे सूट देऊ शकत नाही . या चर्चेत प्रशांत चौधरी यांनी उडी घेत पालिका प्रशासनाच्या माध्यमातून प्रस्तावावर वेळोवेळी पाठपुरावा केला नसल्याचे सांगितले . सर्वसाधारण सभेत नंदुरबार शहरातील दोशाह तकीया ते पुर्वेस देसाईपुरा पेट्रोल पंप पर्यत रस्ता ट्रिमिक्स पध्दतीने करण्यासाठी ८२ लाख ५० हजार ४६४ रूपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली.तसेच दोशाह तकीया पासून ते उत्तरेस जुनी भोई गल्ली ते मंगळ बाजारातील इंडिय स्टोर्स ( नाला ) पर्यंत गटार करणे व रस्ता ट्रिमिक्स पध्दतीने करण्यासाठी ९२ लाख १८ हजार ७३८ रूपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. साक्री नाक्यापासून ते पूर्वस लकी दुबार ते पारशी चक्की पर्यत गटार करणे व रस्ता ट्रिमिक्स पध्दतीने करण्या करीता ५४ लाख ८९ हजार ९०० रूपयांच्या अंदाजपत्रक मंजूरी देण्यात आली.यासह मोकाट गरे पकडल्यानंतर गुरे मालकांना दंड आकारण्या बाबत विचार विनिमय करून सभेत १५ विषयांना मंजुरी देण्यात आली.आयत्या वेळी आलेल्या विषयात नंदुरबार शहरातील संपूर्ण रस्ते डिवाईडर रंगरंगोटी करणे व रोड फर्निचरची कामांच्या संभाव्य खर्चास मान्यता देण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार शेतकरी संघातर्फे शासकीय आधारभूत भरड धान्य खरेदी केंद्राचे उदघाटन

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मराठा समाजातर्फे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add