नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा हा गेल्या अनेक वर्षांपासून गौतस्करी आणि गोवंश कत्तलीचा बाबतीत कुप्रसिद्ध आहे. जिल्ह्याचा सीमेलगत असलेले गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून नर्मदा नदीतून आणि वाहनाद्वारे मोठया प्रमाणात अवैध गौतस्करी चालते. गौतस्कर हे गोवंश कत्तलीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह मालेगाव, मुंबई येथे वाहतूक करतात. या गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तल थांबवून गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच गोरक्षकांनी केलेल्या मागण्या मान्य न झाल्यास दि.१५ जुलैपर्यंत तीव्र आंदोलन छेडण्याचा गोरक्षकांनी दिला. या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांना दिले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, गोरक्षक आणि गौसेवक वेळोवेळी कत्तलीसाठी घेऊन जाणार्या अवैध वाहतुकीचा विरोधात आवाज उठवतात त्यावेळी प्रशासन तात्पुरता स्वरूपाची कारवाई करते त्यामुळे त्यावर पायबंद बसत नाही. प्रशासन कडून कारवाई होत नसल्याने गौरक्षक स्वतःच्या जीव धोक्यात घालून गोवंश वाचविण्याचा प्रयत्न करतात. दि ७ जुलै रोजी अवैध गोवंशाची वाहतूक करणारा ट्रकचा पाठलाग नंदुरबार ते विसरवाडी दरम्यान करतांना गाडीतील गौतस्कर गाडी पकडली जाऊ नये म्हणून गाडीतून लाल मिरची पावडर गौरक्षकांवर फेकत होते जेणेकरून गोरक्षकांचा अपघात व्हावा. नंदुरबार जिल्ह्यात या आठवड्याभरात गोरक्षकांचा सतर्कतेमुळे पोलीस प्रशासनाला दिलेल्या माहितीमुळे ४ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. हा सर्व भाग लक्षात घेता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बकरी ईद निमित्ताने गोवंशचा हत्येच्या उद्देशाने अवैध वाहतूक होत आहे आणि अशी गोवंशाची अवैध वाहतूक कायमच होत असते, तरी यावर कायमस्वरूपी पायबंद घातला जावा प्रशासनाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुकांसह तातडीने उपाययोजना करून गोवंशाचा जीवाचे रक्षण करावे. अवैध गोवंश वाहतूक व कत्तल थांबविण्यासाठी जिल्हाभरात कायमस्वरूपी चेकपोस्ट निर्माण करण्यात यावे.गोवंश हत्याबंदी पथक निर्माण करून त्यावर जिल्ह्यात वरिष्ठ अधिकार्यांनी (उपविभागीय पोलीस अधिकारी) नेमणूक करावी व प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत अशी पथके कायमस्वरूपी निर्माण करून स्थानिक पोलीस अधिकारी नेमणूक करावी.पथकातील सर्व अधिकारी आणि यांचे संपर्क क्रमांक सार्वजनिक करावा, प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत गोवंश हत्याबंदी पथकात स्थानिक गौरक्षक- गौसेवक यांचीही नियुक्ती करून त्यांना ओळखपत्र प्रदान करण्यात यावे. गोवंश पकडल्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणार्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करावी.अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक सोसायटीचे सदस्य ऍड रोहन गिरासे, विश्व हिंदू परिषदेचे अजय कासार, गौरक्षक भूषण पाटील, खुशाल भोई, धर्मसेवक मयुर चौधरी, सुमित परदेशी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे दिग्विजय ठाकरे आदींच्या स्वाक्षरी आहेत.