नंदुरबार l प्रतिनिधी
ओबीसी आरक्षण राजकीय दृष्ट्या कमी करून पुढे सगळे आरक्षण कमी करण्याचे षड्यंत्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे. असा आरोप बाराबलुतेदार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केला.
नंदुरबार जिल्हा संपर्क अभियान यावेळी बाराबलुतेदार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव दळे म्हणाले की, ओबीसींचे आरक्षण पूर्ण आता राजकीय आरक्षण घालायचं नंतर शैक्षणिक आरक्षण घालायचं नोकऱ्यांमध्ये आरक्षण घालायचं आरक्षण मुक्त ओबीसी करण्याचे धोरण हे सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये धोरण तयार झाले आहे संसदेत एकही शब्द बोलत नाही परंतु संसदेबाहेर मीडियासमोर ओबीसी आरक्षण संदर्भात बोलत असतात असा घणाघाती आरोप दळे यांनी केला.
शनिवारी “नंदुरबार जिल्हा” संपर्क दौरा होते. नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व सर्व बाराबलुतेदार समाजाच्या पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थितीत ते म्हणाले की, 335 जातीचा समाज हा राज्याच्या सामाजिक , शैक्षणिक , राजकीय , आर्थिक या सगळ्या गोष्टींपासून वंचित आहेत . पारंपारिक व्यवसाय पारंपारिक व्यवसाय व्यवसाय राजकारणा मध्ये आमच्ये स्थान नाही. एकत्र मोठ बांधणार आहोत.ह्या प्रक्रिया मध्ये 78 संघटना सहभागी होऊन. भविष्य काळामध्ये संघटना नसून एक मोठी चैतन्य निर्माण होऊन वाटचाल चाल करणार आहे.
नंदुरबार विश्रामगृह येथे बाराबलुतेदार महासंघाचे संस्थपक अध्यक्ष कल्याणराव दळे यांचे शिंपी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी नंदुरबार शिंपी समाजाचे अध्यक्ष सोमनाथ शिंपी , प्रदीप सोनवणे , दत्तात्रय निकुंबे , सुरेश करवंदकर , मनोहर चौधरी , भामरे सर , रवींद्र जगताप , प्रदीप शिंपी , वैभव करवंदकर तसेच सुतार समाजाचे वाल्मीक मिस्तरी त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.










