Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भारतीय संस्कृती आत्मसात केल्यास प्रत्येकाचा उत्कर्ष : प.पु.पं.भगरे गुरुजी

team by team
December 18, 2021
in राज्य
0
भारतीय संस्कृती आत्मसात केल्यास प्रत्येकाचा उत्कर्ष : प.पु.पं.भगरे गुरुजी

नंदुरबार l प्रतिनिधी –
भारतीय संस्कृती विविध परंपरांनी नटलेली आहे. तिचा अभिमान प्रत्येक भारतीयाला असायलाच हवा. याच संस्कृतीच्या जोरावर जगभरात भारतीयांचा सन्मान होतो. मात्र आपली संस्कृती विसरुन पाश्‍चात्य संस्कृतीचा आहारी जात आहोत, अशी खंत व्यक्त करुन प्रत्येक भारतीयाने आपली भारतीय संस्कृतीचा जीवनात अंमल करणे गरजेचे असल्याचे मत प.पु. पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी व्यक्त केली.

येथील नंददर्शन (चित्ते) परिवाराच्यावतीने स्व.जुलालसिंग बाजीराव राजपूत (जिभाऊ) व स्व.उषादेवी जुलालसिंग राजपूत यांच्या स्मरणार्थ आयोजित श्रीमद् भागवत कथा सप्ताहात काल चौथ्या दिवशी प.पु. भगरे गुरुजी यांनी स्वायंभूव मनु, सतीचरित्र, धृवचरित्र, प्रियव्रत चरित्र, भरतचरित्र, अजामिळ उध्दार प्रल्हाद अवतार, नरसिंह अवतार यावर आपल्या मधुरवाणीने भागवत कथेचे निरुपण केले. भारतीय संस्कृती धृ्रवासारखे चरित्र होवुन गेले आहे. देवर्षी नारदाने गुरुमंत्र दिल्यानंतर धृ्रव बाळाने इतिहास घडविला. कोणाकडुनही अपमान झाल्यास त्याचे वाईट वाटुन घेवु नका. अपमान हा आपल्या चांगल्यासाठी असतो. आपमान न मानता त्यातुन शिकुन आपल्या व्यक्तीमत्वात बदल घडुन आणु शकतो, असाच संदेश धृ्रव बाळाच्या चारित्र्यातुन मिळतो. कोणाचे मन दुखेल असे कधीही बोलु नका. आपले आयुष्य सखोल व्हावे, असाच प्रत्येकाचा प्रयत्न असतो. मृत्यू नंतरच्या आत्म्याचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी अन्नदान, वस्त्रदान व औषधी दान हे विचार न करता करायला हवे. स्वभावातील कोपिस्टपणा, कटु वाणी, दरिद्रता व परिवार अथवा समाजात वैर निर्माण करणार्‍यांचा सन्मान कधीही होत नाही. प्रत्येकाने आपल्या लक्ष्मण रेषेत राहुन कार्य केले तर प्रत्येकाचे जीवन सफल होणार आहे. यावेळी भगरे गुरुजी यांनी आईचा महिमा सांगुन अनेकांना भावनिक केले. यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय यासह विविध भजनांच्या तालावर अबाल वृध्दांनी ठेका धरला.

बातमी शेअर करा
Previous Post

खामगाव शिवारात २३ हजाराची वीज चोरी, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

Next Post

श्रीराम देवस्थान जमिन प्रकरणी स्टेटस रिपोर्ट सादर करा : उच्च न्यायालयाचा आदेश

Next Post

श्रीराम देवस्थान जमिन प्रकरणी स्टेटस रिपोर्ट सादर करा : उच्च न्यायालयाचा आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add