Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नंदुरबारच्या शिक्षक संघटना प्रतिनिधींची आज बैठक

team by team
December 17, 2021
in शैक्षणिक
0

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर साधक बाधक तोडगा काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी व्यापक बैठक जिल्हा परिषदेच्या याहमोगी सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या विविध संघटनांतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना वेळोवेळी विविध मागण्यांबाबत निवेदन सादर करण्यात येतात. सर्व संघटनांनी सादर केलेल्या वेगवेगळ्या मागण्यांबाबत सत्वर निर्णय घेणे प्रशासनाला सुकर व्हावे यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलाविले आहे. जिल्ह्यातील शिक्षकांच्या सर्व प्रलंबित मागण्यांबाबत साधक-बाधक निर्णय घेणे सोपे व्हावे, हा यामागचा हेतू असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गेल्या तीन महिन्यांपासून जीवन वेतन नियमित करून शिक्षकांचा मोठा प्रश्न मार्गी लावलेला आहे. तरीसुद्धा शिक्षकांचे अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. शिक्षकांच्या जीपीएफ चा विषय असेल, वैद्यकीय बिले, सर्व शिक्षा अभियान अंतर्गत बांधकाम, शिक्षकांच्या पदोन्नती, जिल्ह्यातील शिक्षकांची सेवा जेष्ठता यादी, सातव्या वेतन आयोगाचा हप्ता, एक स्तर वेतन श्रेणी असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
प्राथमिक शिक्षकांच्या या सर्व प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी दि. १७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृह ही बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस कोविड १९ प्रादुर्भाव लक्षात घेता संघटनांचे अध्यक्ष व सचिव अथवा त्यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांनीच उपस्थित राहावे. तसेच प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात मुद्देसुद व थोडक्यात आपले म्हणणे मांडावे, अश्या आशयाचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे ( भाप्रसे ) यांनी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षक संघटनांच्या अध्यक्षांना दिले आहे.
या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी, उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, डॉ. युनूस पठाण, प्रशासन अधिकारी सुभाष मारनर यांच्यासह शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रत्येकाच्या जीवनातील पाप-पुण्याचा हिशोब होणार : प.पु.पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी

Next Post

एस.टी.महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी नंदुरबार आगारातील संपकरी कर्मचार्‍यांनी सर्वधर्मिय देवीदेवतांना घातले साकडे

Next Post
एस.टी.महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी नंदुरबार आगारातील संपकरी कर्मचार्‍यांनी सर्वधर्मिय देवीदेवतांना घातले साकडे

एस.टी.महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी नंदुरबार आगारातील संपकरी कर्मचार्‍यांनी सर्वधर्मिय देवीदेवतांना घातले साकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add