नंदूरबार l प्रतिनिधी

तळोदा शहरासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने ५५ सीसीटिव्ही कॅमरे मंजूर केले असून हे कॅमेरे बसविण्यासाठी शनिवारी कंपनीच्या कर्मचार्यांमार्फत तळोदा शहरात सर्वेक्षण करण्यात आले आहे.पोलिस प्रशासनाने केलेल्या कार्यवाही बाबत तळोदा शहरातील व्यापार्यांनी केलेल्या सतत पाठपुराव्याला यश आले असून याबाबत व्यापार्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
तळोदा शहरातील एका व्यापार्यावर प्राणघातक हल्ल्यासह चोरट्यांनी केलेल्या दरोड्याचा प्रयत्न असफल झाला होता. परंतू या घटनेने व्यापार्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीती पसरली आहे.साहजिकच गुन्हेगारी कारवाया रोखण्याबाबत तळोदा शहरातील बंद सीसीटिव्ही कॅमरे सुरू करण्याबाबत व्यापार्यांनी पोलिस प्रशासनाबरोबरच पालकमंत्री,खासदार,जिल्हा प्रशासनाकडे तळोदा शहरातील व्यापारी महासंघाने प्रत्यक्ष भेट घेवून पाठपुरावा केला होता.या शिवाय स्थानिक पोलीस प्रशासनाने देखील प्रस्ताव दाखल केला होता.त्याची दखल घेवून जिल्हा पोलीस प्रशासनाने कॅमेर्याचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून नाशिक येथील कंपनीस कॉन्ट्रॅक्ट दिला आहे.साहजिकच कंपनीचे कर्मचारी शनिवारी दुपारी तळोदा येथे आले होते.त्यांनी कॅमरे कुठे,कुठे बसवायचे या बाबत सर्व्हेक्षण करण्यात आले.साधारण ५५ कॅमेरेे बसविण्यात येणार आहेत.तळोदा शहरातील कॅमरे गेल्या तीन,चार वर्षां पासून बंद पडलेले होते.या बाबत स्थानिक पोलीस ठाण्याने अनेक वेळा बदलण्याची मागणी केली होती.मात्र व्यापार्यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे मागणी लावून धरल्याने हा प्रश्न मार्गी लागणार आहे.साहजिकच व्यापार्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.तथापि कॅमेर्यांची. ही सिस्टीम तकलादू न लावता चांगल्या दर्जाची लावण्याची अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.









