नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील संत रोहिदास चौकात संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पुण्यतिथीचे औचित्य साधुन नगरपालिकेचे बांधकाम सभापती प्रमोद शेवाळे यांनी चर्मकार समाज बांधवांसाठी तयार केलेल्या बोेअरवेलचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले. तसेच चर्मकार समाजासाठी तयार केलेल्या बोेअरवेलचे उद्घाटन नंदुरबार नगरपालिकेतील बांधकाम सभापती प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरीक दगडू अजिंठे यांनी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेवुन स्वतःसह समाजाची प्रगती करावी. तसेच रमेश मालखेडे यांनी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जीवनकार्याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमास नगरसेवक कुणाल वसावे, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दगडु अजिंठे, ज्येष्ठ नागरीक चतुर अहिरे, रमेश मलखेडे, शंकर अहिरे, बापू ठाकरे, चर्मकार समाजाचे नंदुरबार अध्यक्ष विजय अहिरे, उपाध्यक्ष दीपक अहिरे, सचिव धनराज अहिरे, खजिनदार सुरेश अहिरे, संतोष अहिरे, मोहन अहिरे, अशोक अहिरे, बाबुलाल अहिरे, नितीन अहिरे, विशाल अहिरे, रोहित अहिरे, हेमंत अहिरे, दिनेश अहिरे, अर्जुन तिजविज यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. यावेळी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जीवनकार्याला उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश मालखेडे यांनी केले.








