नंदुरबार येथील धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या प्रदेशध्यक्षा धनश्री आजगे यांना राष्ट्रीय यशवंतरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
५ डिसेंबर २०२१ रोजी जळगाव येथे श्री साई बहुद्देशीय संस्थेतर्फे राष्ट्रीय यशवंतरत्न पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. भारतातील सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, कला, साहित्य अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या एकूण ६० पुरस्कारार्थींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे तेरावे वंशज भूषणसिंह राजे होळकर व माजी मंत्री अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी श्री साई बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ.संगिता पाटील, जळगावच्या राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा सौ.वंदना चौधरी, हिंगोलीच्या शिवसेना महिला जिल्हाप्रमुख रेखा देवकाते, डॉ.उषा देशमुख आदी उपस्थित होते. नंदुरबार येथील धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या प्रदेश अध्यक्षा धनश्री आजगे गेल्या ६ वर्षांपासून महिला सक्षमीकरण, धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न, मेंढपाळांच्या समस्या, समाज प्रबोधन, शिक्षण आदी क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांच्या या समाजकार्याची दखल घेवून त्यांना राष्ट्रीय यशवंतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. धनश्री आजगे यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.








