नंदुरबार l प्रतिनिधी
एड्स ,एचआयव्ही बाबत समाजातील अनेक समज गैरसमज आहेत ते दूर करून जनजागृतीचा संकल्प करीत जिल्हात जागतिक एड्स दिना निमित्त 1 ते 7 डिसेंबर मध्ये विविध एड्स जनजागृती कार्यक्रम माध्यमातून जनजागृती कार्यक्रम नवनिर्माण संस्थेमार्फत राबविण्यात आली .
यामध्ये एच आय व्ही/एड्स क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार, सामूहिक एडस विरोधी प्रतिज्ञावाचन’ एड्स जाणा, एड्स टाळा’, या सारख्या घोषवाक्य द्वारे तसेच रांगोळीच्या माध्यमातून महाविद्यालय मध्ये जनजागृती,तालुका पातळीवर पोस्टर, रांगोळी, पथनाट्यद्वारे जाणीव जागृती, शहादा येथे आरोग्य जनजागृती शिबीर घेण्यात आले ,४ डिसेंबर रोजी महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी साठी एच आय व्ही एड्स जनजागृती,५ डिसेंबर रोजी एचआयव्हीग्रस्त महिला पुरुषांना हेल्थ किट सॅनिटायझर वाटप करण्यात आले ,६ डिसेंबर रोजी जिल्हापातळीवर सांस्कृतिक कार्यक्रम शासकीय योजना माहिती सवांदकार्यक्रम ,७ डिसेंबर रोजी नंदुरबार येथे एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शक शिबिर एड्स जनजागृती सप्ताह कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला . या कार्यक्रमाना प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्ता सुलभा महिरे ,प्रा.माधव कदम,संतोष नांद्रे ,राजेश ईशी डॉ.समताज्योती तायडे (टाटा इन्स्टिट्यूट ) ,तेजल माळी ,आय.सी. टी.सी. समुपदेशक नंदुरबार गणेश कासार,ए. टी.आय. समुपदेशक ,साजिद अन्सारी ,मगन वळवी ,किरण देवरे ,सुभाष निकंब ,मच्छिंद्र पाटील , डॉ.राजकुमार तमायचेकर आदि उपस्थित होते ,कार्यक्रम यशस्वी नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी ,प्रकल्प व्यवस्थापन संजय वळवी ,समुपदेशक मनीषा पाडवी ,भूमिका भगत ,शोभा मराठे,दिलीप पावरा ,कौशल्या चौरे,भूषण साळुखे ,रितेश गावित ,सुदाम वसावे ,हेमंत मांडलिक ,हेमंत पगारे अंबालाल भोई, आदि परिश्रम घेतले.








