नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाचा कालावधी एक-एक वर्षाचा करण्यात आला आहे.उर्वरीत शेवटच्या वर्षासाठी उपसरपंचपदी शिवसेनेच्या सोनाली अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
रजाळे येथे ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी सर्वांनुमते सोनाली पाटील यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. याप्रसंगी सरपंच रेखाबाई पाटील, कृऊबाचे माजी सभापती किशोर पाटील, शंकर पाटील व ग्रा.पं.सदस्य गुलाब भिल, रासकोरबाई राजपूत, भावराव मराठे, मनोज पाटील,भटू मराठे, विद्या पानपाटील, अल्का भिल, ग्रामसेवक चंद्रसिंग ठाकरे आदी उपस्थित होते. निवड झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांतर्फे उपसरपंच सोनाली पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सोनाली पाटील यांचे कौतुक केले आहे.