Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव येथे ११ लाख विदेशी दारुसह १९ लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
December 7, 2021
in क्राईम
0
धडगाव येथे ११ लाख विदेशी दारुसह १९ लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव येथील मोलगी रस्त्यावर आज सायंकाळी ५ च्या सुमारास पोलीसांनी ११ लाख १३ हजाराची विदेशी दारुसह ८ लाखाच्या वाहनासह एकुण १९ लाख १३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी दोघांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव शहरातील मोलगी रस्त्यावरील कनकुवा पेट्रोलपंपासमोर आज दि.७ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास शहादा येथून धडगाव येथे अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस दबा धरून बसले असता.पवन होमसिंग चौधरी रा.मडकानी ता.शहादा व प्रविण दिलीप वसावे रा.कुरंगी ता.शहादा हे बोलेरो पिक अप (क्र.एमएच १३-एनएक्स ६७२३) मध्ये विदेशी दारुची वाहतूक करतांना आढळून आले.
त्यांचा वाहनाची पोलीसांनी तपासणी केली असता त्यात ९ लाख ७५ हजार रुपये किमतीची बॉम्बे व्हिस्की कंपनीचे १५० बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये १८० एमएलच्या ५० प्लास्टिक क्वार्टर होत्या. प्रत्येक क्वार्टरची किंमत १३० रुपये आहे.तसेच १ लाख ३८ हजार रुपये किमतीची सुपर स्ट्रॉंग पॉवर १०००० बियरचे टीन असलेले ५० बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये २४ टीन बियर होती. प्रत्येक टीनची किंमत ११५ रुपये आहे. याशिवाय ८ लाखाची महिंद्रा बोलेरे जिप असा एकुण १९ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे.
याबाबत पोना दीपक वारुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहूल भदाणे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्हयात आज आढळला एक कोरोना रुग्ण

Next Post

रजाळे ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या सोनाली पाटील यांची बिनविरोध निवड

Next Post
रजाळे ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या सोनाली पाटील यांची बिनविरोध निवड

रजाळे ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या सोनाली पाटील यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add