धडगांव l प्रतिनिधी
अक्राणी तालुक्यातील निमझरीपाडा हा पाण्याच्या तुटवड्याने ग्रस्त असतो. जलसाक्षरता समितीने सदर गावात वेळोवेळी भेट देवुन पाण्याचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन तेथील नागरिकांना केले आहे.
प्राचार्य डाॅ एच एम पाटील, पाणी फाऊंडेशन ॲड राजेश हिवरे, शहादा तालुका समन्वयक गुणवंत पाटील प्रा अनिंल शिंदे डाॅ हरीभाऊ पवार, भरत पावरा, आदिंनी सदर गावाला भेट देवुन तेथील परिस्थिती जाणुन घेतली. त्याच प्रक्रीयेतुन तेथे नुकताच एक वनराई बंधारा बांधण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य व स्थानीक जलसाक्षरता समितीचे प्रमुख खंडु पावरा यांच्या पुढाकाराने व उदेसिंग ठुग्या पावरा, विजय लकड्या पावरा,
हारसिंग विकला पावरा यांच्या सहयोगाने हा वनराई बंधारा बांधण्यात आला. या कामी दिनेश पावरा,शिवाजी पावरा, विनोद वसावे,विजय पावरा महेश पावरा,तुकाराम पावरा, गोमा पावरा, अंकित पावरा, जामसिंग पावरा,भाज्या पावरा, नाना पावरा,रतिलाल पावरा, गोपाल पावरा,जोमा पावरा, मेरसीगं पावरा,रविंद्र पावरा, मदन पावरा, पियुष पावरा,करन पावरा, गिलदार पावरा, योगेश पावरा सचिन पावरा, के के पावरा यांनी सहभाग नोंदविला.








