नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक उपक्रम “एक वही एक पेन” उपक्रमाचे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प वाहून आदरांजली शाळेचे मुख्याध्यापक सुदाम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना जय भीम चित्रपट दाखवण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची शिकवण शिका, संघटित व्हा संघर्ष करा याप्रमाणे शिक्षकांनी स्वखर्चाने एक वही पेन वाटप करण्याचा संकल्प केला. त्यानंतर सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. जय भीम चित्रपट सामाजिक घटनेवर आधारित शाळेतील विद्यार्थ्यांना अमेझॉन प्राईमवर नुकताच जय भीम चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. शाळेत एलईडी टिव्हीवर दाखविण्यात आला. मुलांना खूप आनंद झाला.शाळेतील विद्यार्थ्यांनी दिपिका महिरे या विद्यार्थ्यांनी भाषण केले व कविता सादर केली. यावेळी शाळेतील शिक्षक भरत पावरा,चंदू पाटील उषा पाटील,गोपाल गावित तसेच शालेय पोषण आहार स्वंयपाकिण सुरेखा पाटील,कविता सोमवंशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा पाटील यांनी केले व उपस्थितांचे आभार भरत पावरा यांनी मानले.








