नंदुरबार | प्रतिनिधी
कोरोना नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन हा पुर्वीच्या व्हेरिएंट पेक्षा अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. देशासह राज्यातही ओमिक्रॉनचा रूग्ण आढळला आहे.या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनातर्फे तयारी सुरू करण्यात आली असुन सद्यस्थितीत ५ हजार पीपीई किट उपलब्ध असून तीन ऑक्सिंजन प्लांटही सज्ज आहे. जिल्ह्यात गरज पडल्यास बेडस वाढवण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
ओमिक्रॉन व्हेरिटंएच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठज्ञकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी आरोग्य अधिकार्यांशी संवाद साधून अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर आरोग्य विभाग संस्ळाव्य तिसर्या लाटेला थोपवण्यासाठी सज्ज झाला आहे. तिसरी लाट केवळ आरोग्य यंत्रणेच्या भरवशार नियंत्रित होणार नाही तर त्यासाठी जनतेलाही साथ द्यावी लागार आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयात सद्यस्थितीत १५० बेडची सुविधा असून ५ हजार पीपीई किट उपलब्ध आहेत. त्याचबरोबर १७ हजार मास्कचासाठा शिल्लक आहे. व्हेंटिलेटरही उपलब्ध आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयात नंदुरबार ३, अक्कलकुवा १, नवापूर १ असे पाच कोविड रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयात सहा पारिचारीका पाच कोविड रूग्णांवर उपचार करत आहे.
१ हजार २५० ऑक्सिजन सिलींडर
तळोदा व नवापूर येथे १० किलो लिटर क्षमतेचे दोन ऑक्सिजन प्लांट अंतिम टप्यात आहे. शहादा येथे ऑक्सिजन प्लांटचे काम पूर्ण झाले आहे. नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालयात हवेतून ऑक्सिजन तयार करणार्या ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित आहे. त्यामुळे तिसर्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. तसेच जिल्हा रूग्णालयात १ हजार २५० ऑक्सिजन सिलींडर शिल्लक आहे.