नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील धुळे रस्त्यावरील वाघेश्वरी माता मंदिराच्या पुढे टेकडीवर असलेल्या काशिनाथ बाबा मंदिरावर कार्तिक वद्य आमावस्या निमित्त मानकरी काशिनाथ हिरणवाळे यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला.
गवळी समाजासह अनेक भाविकांचे श्रद्धास्थान व नवसाला पावणारे काशिनाथ बाबा मंदिरावर प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही धार्मिक उपक्रम झाले. शासनाच्या नियमावली प्रमाणे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने होमहवन पूजा अर्चा करण्यात आले. उत्सवानिमित्त भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी संयोजकांनी भाविकांना कोरोना प्रतिबंध लसीकरण करण्याचे आवाहन देखील केले.








