Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील खेळाडूंचे राष्ट्रीय स्तरावरील प्राविण्य अभिमानास्पद बाब : नगराध्यक्ष रविंद्र पवार

team by team
December 4, 2021
in राज्य
0
जिल्ह्यातील खेळाडूंचे राष्ट्रीय स्तरावरील प्राविण्य अभिमानास्पद बाब : नगराध्यक्ष रविंद्र पवार

नंदुरबार l प्रतिनिधी
खेळाडूंचे मैदानावर असलेले प्रेम व क्रीडा शिक्षकांची असलेली मेहनत यामुळेच नंदुरबार जिल्ह्यात भव्यदिव्य स्वरुपात स्पर्धा होतात. जिल्ह्याचे खेळाडू राज्य, राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवतात, ही एक अभिमानास्पद बाब आहे. असे प्रतिपादन नंदुरबार नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष रविंद्र पवार यांनी केले. ते येथील ४५ वी राज्यस्तरीय वरिष्ठगट टेनिक्वाईट अजिंक्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली व नंदुरबार जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशनच्यावतीने ४५ वी राज्यस्तरीय वरिष्ठगट टेनिक्वाईट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन नंदुरबार नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष रवींद्र पवार व नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी उपसंचालक सुनंदा पाटील म्हणाल्या की, दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर खेळाडू या राज्य स्पर्धेच्या माध्यमातून मैदानावर आलेले आहेत. यातूनच खेळाडूंना नवसंजीवनी मिळेल. यासाठी सर्वांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनचे सचिव अनिल वर्पे, मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, उपमुख्याध्यापक राजेश शहा, क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष पंकज पाठक, उपाध्यक्ष श्रीराम मोडक, संघटनेचे सचिव प्रा.डॉ.मयुर ठाकरे, धुळे जिल्हा सचिव प्रकाश पाटील, रेफ्री बोर्डाचे चेअरमन मृणाल बांडेबुचे, क्रीडाशिक्षक जगदीश वंजारी आदी उपस्थित होते. स्पर्धेला महाराष्ट्र राज्यातून २१ मुलांचे व १८ मुलींचे असे एकूण ३९ संघातील २३४ खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा मुला-मुलींचा संघ निवडला जाणार आहे. ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राचा संघ याच ठिकाणी घोषित होणार आहे. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची निवासाची व भोजनाची व्यवस्था नंदुरबार जिल्हा टेनिक्वाईट संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून करण्यात आली आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी आनंदा मराठे, राजेश्वर चौधरी, भरत चौधरी, अक्षय जेठे, राकेश चौधरी, चेतन जोहरी, धनंजय बोरसे, जितेंद्र पगारे, विशाल पवार, जितेंद्र माळी आदी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर ठाकरे यांनी केले. तर आभार श्रीराम मोडक यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव शहरातून १२ हजाराचा गांजासह एकाला अटक

Next Post

शहादा शहरासह तालुक्यातून दोन मोटारसायकल लंपास

Next Post
शहादा शहरासह तालुक्यातून दोन मोटारसायकल लंपास

शहादा शहरासह तालुक्यातून दोन मोटारसायकल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add