नवापूर ! प्रतिनिधी
नवापूर शहरातील टेलिफोन ऑफिसच्या कार्यालयासमोर राष्ट्रीय महामार्ग ६ चे चौपदरीकरणाचे कन्ट्रक्शनचे काम सुरू आहे.या ठिकाणी वंडर सिमेंट कंपनीचा टँकर घेऊन येणारा चालकाचा हाय व्होल्टेज असलेल्या 33 के व्ही विद्युत तारेला शॉक लागून जागीच मृत्यू झाला.
नवापूर पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरडाणा येथून एका सिमेंट कंपनीच्या प्लांट मधून ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून सुटे सिमेंट वाहन चालक भगवान बडगुजर (वाहन क्र. एम.एच. 04 एफ.पी.6104) घेऊन येत असताना आज दुपारच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाचे कन्ट्रक्शन करणारी कंपनीचे सिमेंट खाली करून टँकर वरील झाकण उघडे राहून गेल्याने झाकण बंद करण्यासाठी वर चढला असता वरील हायव्होल्टेज असलेल्या 33 केव्ही विद्युत तारेला स्पर्श होऊन चालक भगवान भास्कर बडगुजर( वय 45 ) रा.रथचौक सोनगीर,धुळे हा वाहना वरून जमीनीवर फेकला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे .नवापूर येथील पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळं,पो.हे.का युवराज परदेशी, योगेश तनपुरे यांनी 108 रुग्ण वाहिका बोलावून उपजिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉक्टर यांनी त्याला मृत घोषित केले आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळं करत आहेत.