Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्व.बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर केवळ व्याख्यान दिले नाही तर जगातील शिवप्रेमींच्या मनामनात पोहचवलं : डॉ.पुष्कर शास्त्री

team by team
November 26, 2021
in सामाजिक
0
स्व.बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर केवळ व्याख्यान दिले नाही तर जगातील शिवप्रेमींच्या मनामनात पोहचवलं : डॉ.पुष्कर शास्त्री

नंदुरबार l प्रतिनिधी
“शिवशाहीर स्व.बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर केवळ व्याख्यान दिले नाही तर जगातील शिवप्रेमींच्या मनामनात पोहचवलं” असे प्रतिपादन शहादा येथील डॉ.पुष्कर शास्त्री यांनी आज स्व.बाबासाहेब पुरंदरे श्रद्धांजली सभेत बोलताना केले.

अ.भा.साहित्य परिषद, श्री जी वाचनालय, शिवशंभू प्रतिष्ठान नंदुरबारच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथे आज दि.२६ नोव्हेंबर रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून शहादा येथील विकास हायस्कूल मधील प्रा.डॉ.पुष्कर शास्त्री बोलत होते. स्व.बाबासाहेबांच्या जीवन कार्याचे अनेक पैलू त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ.भा.साहित्य परिषदेचे शशिकांत घासकडबी यांनी केले. यावेळी त्यांनी अ.भा साहित्य परिषदेच्या कार्याची माहिती दिली तसेच बाबासाहेबांच्या काही आठवणी सांगितल्या.

या प्रसंगी प्रा.पंकज पाठक, सौ.कल्याणी डांगे, प्रा.सौ.वर्षा घासकडबी यांनी देखील त्यांच्या सहवासातील काही आठवणींना उजाळा दिला. येथील श्रीजी वाचनालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी स्व बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण व बाबासाहेबांच्या ग्रंथांचे पूजन करण्यात आले. यावेळी श्रीजी वाचनालयाचे अध्यक्ष संदीप चौधरी,जेष्ठ साहित्यिक प्रभाकर भावसार, ग्रंथपाल सौ.ऋता चौधरी आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत खेडकर यांनी केले. पत्रकार दीपक कुळकर्णी, संतोष पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

शहरातील अनेक शिवप्रेमी नागरिक , पत्रकार कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी स्व.बाबासाहेब पुरंदरे, तळोदा येथील ग्राहक पंचायतीचे स्व.मार्तंडराव जोशी तसेच २६/११ मधील शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्य सरकारचा कोरोनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांसाठी मोठा निर्णय

Next Post

बिरसा फायटर्स संघटनेच्या नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी भरत पावरा यांची निवड

Next Post
बिरसा फायटर्स संघटनेच्या नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी भरत पावरा यांची निवड

बिरसा फायटर्स संघटनेच्या नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी भरत पावरा यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add