नवापूर | प्रतिनिधी-
शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी राज्य सरकारने भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन केल्याबाबत निषेध करणारे निवेदन नवापूर भाजपातर्फे तहसिलदार मंदार कुलकर्णी यांना देण्यात आले.यावेळी सर्व पदधिकार्यांनी तहसिलकार्यालया समोर आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
या निवेदना मध्ये म्हटले आहे की, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रसेच्या आघाडी राज्य सरकारने तालीबानी पध्दतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून भाजपाच्या एकूण १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन केले आहे. सदरचे निलंबन अयोग्य असून आम्ही त्या पध्दतीच्या निषेध करीत आहोत असे निवेदना मध्ये नमुत करण्यात आले आहे.तरी तहसिलदार नवापूर यांनी आमची भावना लक्षात घेऊन आमचे निवेदन शासनास पाठवावे अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत,तालुका सरचिटणीस जयंती अग्रवाल,नगरसेवक महेंद्र दुसाने,सोशल मिडीया प्रदेश सदस्य निलेश प्रजापत,शहर अध्यक्ष प्रणव सोनार,तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे,युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष दिनेश चौधरी,भिमसिंग पाडवी,शाहरुक खाटीक,सौरव भामरे,कुणाल दुसाने,संदिप पाटील,गोपी सैन,हेमंत शर्मा,बंटी शर्मा,सोनु दर्जी,यांच्या सह्या आहेत.