तळोदा l प्रतिनिधी
तळोदा शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेले सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्याजागी नवीन कॅमेरे लोकसहभागातून आणण्यासाठी पोलिसांनी शहरातील व्यापाऱ्याशी बैठक घेवून चर्चा केली. परंतू पोलिसांच्या या प्रस्तावास व्यावसायिकांनी स्पष्ट नकार देवून शासन निधीतूनच बसविण्याची मागणी केली. शिवाय कॅमेऱ्याचे काम तत्काळ हाती घ्यावे अन्यथा पुढील यंत्रणांकडे पाठपुरावा करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. .दरम्यान बंद पडलेले कॅमेरे बदलण्याची कार्यवाही हाती घेत असल्याचे आश्वासन पोलिस प्रशासनाने दिली आहे.
तळोदा शहरात अलीकडे भुरट्या चोऱ्या व घरफोडीचा घटना घडल्या आहेत.त्याच बरोबर आता पिस्तूल लवून दरोडा टाकण्याच्या प्रयत्न देखील झाला आहे.परंतु दरोडे खोरांचां हा प्रयत्न व्यापाऱ्यांचा तीव्र संघर्षामुळे नाकाम झाला आहे.तथापि या गुन्हेगारी कारवाया व लुटारूनवर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांच्या तिसरा डोळा बंद झाल्यामुळेच या घटनांमध्ये वाढ होवून चोरट्यांची हिम्मत वाढली आहे.गेल्या आठवड्यात घडलेल्या व्यापाऱ्यावरील सशस्त्र दरोड्याचा घटने मुळेतर व्यापाऱ्यांमध्ये अक्षरश दहशत पसरली आहे.साहजिकच पोलिसांनी आता चोरट्यांचा ठोस बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.या प्रकरणी संतप्त व्यावसायिकांनी सहा दिवसांपूर्वी महसूल व पोलिस प्रशासनाची भेट घेवून चोरट्यांचा बंदोबस्त व बंद सीसीटिव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी केली होती. तळोदा शहरातील बंद केमेरे सुरू करण्या बाबत शनिवारी संध्याकाळी व पोलिस निरीक्षक केलसिग पावरा यांनी पोलिस ठण्यात व्यापाऱ्यांना बोलावले होते.त्यामुळे व्यावसायिकांनी देखील पोलिस निरीक्षक पावरा यांची भेट घेवून सीसीटिव्ही कॅमेरे बाबत चर्चा केली. .त्यावेळी पोलिस निरीक्षक पावरा यांनी बंद पडलेले सीसीटिव्ही कॅमेरे सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांनी लोकसहभागातून मदत करण्याचे मागील बैठकीत सांगितले होते.त्यामुळे त्यांनी पुन्हा मदत करण्याची विनंती केली.मात्र आर्थिक अडचणीतून जावे लागत असल्याने मदत देण्या बाबत व्यापाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला आहे.कारण कोरॉना महामरीत व्यवसायच बंद झाल्यामुळे व्यापारी अक्षरशः भरडला गेला आहे.यात त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.त्यामुळे आर्थिक मदत करता येणे अशक्य असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.त्यामुळे आपण स्वतःशासनाकडे उपाय योजना करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली. तीन,चार दिवसात यावर ठोस कार्यवाही झाली नाही तर पुढील पावले उचलण्याचा इशारा व्यावसायिकांनी दिला आहे.यावेळी महासंघाचे अध्यक्ष आनंद सोनार,किर्तिकुमार शहा,प्रकाश कलाल,प्रसाद सोनार,प्रदीप ठक्कर,मनोज भामरे,पंकज कलाल, हसकुमार जैन,जयेश सूर्यवंशी,परेश गांधी,,राजेश चौधरी, मनीष शाह, आदी व्यापारी उपस्थित होते.








