नंदुरबार l प्रतिनिधी

शहादा येथील अरुण चौधरी यांची शिवसेनेच्या शहादा व अक्कलकुवा विधानसभा सहसंपर्क प्रमुखपदी पक्षाच्यावतीने नियुक्ती करण्यात आली आहे.तर नंदुरबार जिल्हा समन्वय पदी माजी जिल्हाध्यक्ष दिपक गवते यांची निवड करण्यात आली.

मुंबई येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये उत्तर महाराष्ट्र नेते खासदार संजय राऊत आणि धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत यात माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांना पक्षाने शहादा व अक्कलकुवा विधानसभा मतदार संघाचे सहसंपर्कप्रमुख म्हणून नियुक्त केले आहे.तर नंदुरबार जिल्हा समन्वय पदी माजी जिल्हाध्यक्ष दिपक गवते यांची निवड करण्यात आली.या निवडी बद्दल शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकां तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.









