Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अवैध जात प्रमाणपत्र पडताळणी दाव्यांप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे सहसंचालकांचे आदेश, अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या मागणीला यश

team by team
November 21, 2021
in क्राईम
0

सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती पुणे, ठाणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नंदुरबार, गडचिरोली, नाशिक यांनी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र पडताळणीचा दावा नाकारलेल्या (अवैध) प्रकरणांमध्ये घोषित केल्यानंतर संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत, असा आदेश आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्या सहसंचालक जागृती कुमरे यांनी दिला आहे. अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेने केलेल्या पाठपुराव्या यश आले असुन संबंधित समित्यांनी सहसंचालकांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करुन अवैध प्रकरणांमधील संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी अखिल महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी केली आहे.

राज्यातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांकडुन अवैध ठरविण्यात आलेल्या प्रकरणांमधील संंबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेने केली होती. परंतु मागील दहा वर्षाच्या काळात एकही गुन्हा सदर समित्यांकडुन दाखल करण्यात आले नाही. म्हणुन संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा सुरु ठेवुन मागणी केली. अखेर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे सहसंचालक जागृती कुमरे यांनी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या मागणीची दखल घेत राज्यातील जात पडताळणी समित्यांना अवैध घोषित प्रकरणांमधील व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जारी केले आहेत. जात पडताळणी समितीने दहा वर्षात 2010 ते 2020 दरम्यान एकही बोगस अवैध घोषित केलेल्या उमेदवारांवर गुन्हे दाखल न केल्यामुळे असंख्य बोगस, अवैध कर्मचारी यांनी नंतर कोर्टाचा आधार घेवुन अवैध ठरविलेल्या कर्मचार्‍यांनी कोर्टाचा आदेश प्राप्त केला असून बोगस अवैध कर्मचारी खर्‍या आदिवासींच्या सवलतीचा लाभ घेत आहेत. म्हणुुन सहसंचालक यांनी दिलेल्या आदेशानुसार समितीमधील दक्षता पथकातील पोलीस उपअधिक्षक यांनी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अवैध जात पडताळणी दावा प्रकरणांमधील त्या व्यक्तींविरुध्द गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांचा मोर्चा २५ नोव्हेंबरला मंत्रालयावर धडकणार

Next Post

भीमआर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद संविधान यात्रेनंतर कार्यकर्त्याच्या निवासस्थानी देणार भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add