अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा आगारातील आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान एसटीचे शासनात विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या 11 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या एस.टी.च्या कर्मचाऱ्यांनी आज रक्तदान करुन आपली सामाजिक जबाबदारी जपली.
ग्रामिण भागाची जीवनवाहिनी असणाऱ्या लाल परीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एस.टी.चे शासनात विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या 11 दिवसांपासून अक्कलकुवा आगारात आंदोलन पुकारले आहे.या आंदोलन काळात जिल्हा रुग्णालयातील रक्तसाठा संपल्याचे कळल्यावर येथील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबीर घेऊन रक्तदान करुन सामाजीक बांधिलकी जपली. यावेळी अक्कलकुव्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली. अक्कलकुवा आगारातील कर्मचारी किर्तीमंत कुळमेथे,काशिनाथ सरोगदे ,राम पंडीत,मनोज भारती,सुरेश खेडकर,किशोर बोरकर,अजीज शेख यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले तर डॉ. परेश चावडा,महेश कुवर ,जयेश सोनवणे, वैशाली पवार ,महेंद्र चव्हाण ,विशाल चौधरी यांनी रक्त संकलन केले.