नवापूर ! प्रतिनिधी
नवापूर शहरात दुकानाबाहेरील खुर्चीवर नोटांनी भरलेली बॅग ठेवल्याचे व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे . व्यापाऱ्याने बॅग खुर्चीवर ठेवली असता चोरट्याने हातचलाखीने ती लांबविली . या बॅगेत ६० हजार रुपयांची रोकड होती.याप्रकरणी अनोळखीविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत अधिक माहिती अशी की,नवापूर येथील जनता पार्कमध्ये राहणारे व्यापारी विशाल मोहनलाल अग्रवाल यांनी कुंभारवाडा परिसरात अन्नधान्य खरेदी – विक्रीच्या
दुकानाबाहेर असलेल्या खुर्चीवर पैश्यांनी भरलेली बॅग ठेवली . या बॅगेत ६० हजार रुपयांची रोकड होती . अग्रवाल यांनी खुर्चीवर बॅग ठेवताच हातचलाखीतुन भरदिवसा नोटांनी भरलेली बॅग लांबवुन ६० हजाराची रोकड चोरुन नेली . याबाबत विशाल अग्रवाल यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार अनोळखीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी पुढील तपास परीविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक प्रविण कोळी करीत आहेत .