नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील दंडपाणेश्वर मंदिराच्या जवळ असलेल्या छायाचित्रकाराच्या घरातुन अज्ञात चोरट्यांनी एल.ए.डी लंपास केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील दंडपाणेश्वर मंदिराच्या जवळ विकास प्रेमशंकर सोनार यांच्या बंद घराचे कुलुप तोडुन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत १६ हजार रूपये किमंतीचा ४० इंची एल.ए.डी.टि.व्ही.लंपास केला.याप्रकरणी छायाचित्रकार विकास प्रेमशंकर सोनार रा. रा . सोनार गल्ली,नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोना अमोल जाधव करीत आहे.








