नंदुरबार | प्रतिनिधी
घरी येवु दिले नसल्याचा राग आल्याने वृध्द वडीलांवर कुर्हाडीने वार करून जखमी केल्याची घटना जखमी केल्याची घटना खुशगव्हाण येथे घडली. याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा तालुक्यातील खुशगव्हाण येथे वसंत नरशी पाडवी यांनी मुलगा जितेंद्र याची पत्नी व मुलांना घरी येवु दिले नाही. याचा राग आल्याने सुरेंद्र वसंत पाडवी याने कुर्हाडीने वडीलांच्या कानाजवळ मारून जखमी केले. या मारहाणीत वसंत पाडवी हे जखमी झाले असून त्यांनी तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार युवराज रतन मालचे, राहुल प्रदीप मालचे, कैलास प्रेमराज मालचे, विशाल प्रेमराज मालचे या चौघांविरूध्द भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ. ठाकरे करीत आहेत.