नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरात आज चोरट्यांनी धुमाकुळ घालत दिवसाढवळ्या दोन ठिकाणी घरफोडी करत पोलसांनी आव्हानच दिले.एका शिक्षकाच्या घरातुन २ लाख ४० हजाराचा ऐवज लंपास केला असुन दुसर्या ठिकाणीही मोठी घरफोडी झाली असून याबाबत उशीरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.पोलीसांनी संशयीत आरोपींचा पाठलाग केला, मात्र पोलसांच्या हातावर तुरी देत संशयीत आरोपी गाडी टाकुन फरार झाले.त्यांच्या मागावर पथके आहेत.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथील शिक्षक असलेल्या किशोर माणिक रौंदळ हे आज दि.१० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वडीलंाकडे श्राध्दासाठी गेले होते.कार्यक्रम आटोपल्यानंतर ते सहारा टाऊन जवळील रूक्माई नगरातील आपल्या घरी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास परत आले असता.दरवाजा उघडा दिसला.त्यानी घरात जावुन पाहीले असता घरातील गोदरेज कपाट उघडे दिसले व त्यातील सामान जमीनीवर अस्ताव्यस्त पडलेला दिसला .त्यांनतर त्यांनी पोलीसाना कळवीले.पोलीसांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता चोट्यांनी घरातुन १० हजार रूपये रोख व २ लाख ३० हजाराचे दागिने असा एकुन २ लाख ४० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.याप्रकरणी किशोर माणिक रौंदळ यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान दुसर्या घटनेत सहारा टाऊन जवळील हरिभाऊ नगरात चोरट्यांनी दुपारी पुन्हा दुसरी घरफोडी केली.याबाबत रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्र प्रक्रिया सुरू होती.
पोलीसांच्या गाडीला धडक देत चोरटे फरार
नंदुरबार येथे दोन घरफोड्या केल्यानंतर पोलीसांनी चोरट्यांचा माग काढत सिसिटिव्हीचे फुटेज तपासले.त्यात चोरटे दोंडाईच्या कडे जातांना दिसले पोलीसानी दोंडाईचा येथे सापळा रचुन बॅरीकेट्स लावले.चोरट्यांना सुगावा लागताच चोरटे सारंगखेडा कडे फरार झाले.पोलीसांनी याबाबत सारगंखेडा पोलीसांशी संपर्क केला. सारंगखेडा पोलीसांनी रस्त्यावर बॅरीकेट्स लावले.दरम्यान चोरट्यांचा गाडीचा पाठलाग करणार्या पोलीसंाचे वाहन (क्र.एम.एच.३९, ए.बी.८५७०) हिला चोरट्यांची कार (क्र.एम.एच.१८ , डब्लु.२४१५) न धडक दिल्याने पोलीस वाहनाचेही नुकसान झाले.दरम्यान संशयीत चोरटे सांरंगखेडा पोलीस हद्दित गाडी टाकुन फरार झाले.पोलीसांचे पथक उशीरापर्यंत त्यांचा शोध घेत होते.








