नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांचे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचार्यांनी सुरु केलेल्या संपाला नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठींबा दिला आहे. यावेळी नंदुरबार आगारातील संपकरी कर्मचार्यांना पाठींबा पत्र देवुन मनसे पदाधिकार्यांनी चर्चा केली.
राज्यभर एसटी कर्मचार्यांचे संप सुरु आहे. या संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडुन पाठींबा देण्यात येत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने नंदुरबार आगारातील एसटी कर्मचार्यांची भेट घेत संपाला पाठींबा देण्यात आला. एसटी महामंडळातील सर्व कर्मचार्यांना शासनाने शासकीय सेवेत विलीनीकरण करून घ्यावे. तसेच वर्षानुवर्ष दिवस-रात्र सेवा बजावणार्या सर्व कर्मचार्यांना इतर सर्व राज्य शासनाच्या कर्मचार्यांप्रमाणेच वेतन व त्या संबंधातील सर्व सोयीसुविधा शासनाने त्वरित लागू कराव्यात, या मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. नंदुरबार येथील आगारातील एसटी कर्मचार्यांची भेट घेत नंदुरबार जिल्हा मनसेच्या पदाधिकार्यांनी चर्चा करुन संपाला पाठींबा दिला. यावेळी मनसेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनिल कोकणी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण जोशी, मनविसेचे सैनिक राम ठक्कर, खोंडामळीचे गटअध्यक्ष कल्पेश माळी आदी उपस्थित होते. संपाला पाठींबा पत्र देण्याबरोबर एसटी कर्मचार्यांशी मागण्यांसंदर्भात चर्चा करुन मनसे पदाधिकार्यांनी विचारपूस करीत चर्चा देखील केली.








