नंदुरबार | प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समिती, नंदुरबारचे स्व.राजीव गांधी कापुस खरेदी केंद्र, पळाशी येथे कापुस खरेदीचा शुभारंभ आज दि.९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता बाजार समितीचे सभापती हिरालाल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.पहिल्या दिवशी साधारणः १५० क्विंटल कापुस (१० ते १२ वाहने) आवक झाली असुन किमान ८ हजार १०० व कमाल ८ हजार ३९० जास्तीत जास्त या दराने बाजार समितीचे परवानाधारक खरेदीदारांमार्फत कापुस खरेदी करण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे संचालक संभाजी वसावे, बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर, खरेदीदार प्रकाश अग्रवाल, शिरिष अग्रवाल, अशोक चौधरी व शेतकरी आदी उपस्थित होते.