नंदुरबार l प्रतिनिधी
दि. 1 जानेवारी २०२२ रोजी 6 आमदार निवृत्त होत आहेत .त्यामुळे नंदुरबार – धुळे येथील एका जागेसह राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होत आहे . अन्य पाच जागांत मुंबईतील दोन , कोल्हापूर , अकोला – बुलढाणा व नागपूर येथील जागांचा समावेश आहे . या निवडणुकीसाठी १६ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत आहे . नगर व सोलापूर येथील प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक होणार नाही .
येत्या १ जानेवारी २०२२ मध्ये विधान परिषदेतील ६ आमदार निवृत्त होत आहेत . त्यामध्ये अमरिश पटेल ( भाजप ) धुळे- नंदुरबार , रामदास कदम ( शिवसेना ) मुंबई , भाई जगताप ( काँग्रेस ) मुंबई , सतेज पाटील ( काँग्रेस ) कोल्हापूर , गोपीकिशन बजोरिया ( शिवसेना ) अकोला- बुलढाणा , गिरिशचंद्र व्यास ( भाजप ) नागपूर यांचा समावेश आहे . या विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यात दि. १६ ते २३ नोव्हेंबर – उमेदवारी अर्ज दाखल करणे, २४ नोव्हेंबर- उमेदवारी अर्जाची छाननी, २६ नोव्हेंबर- उमेदवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस, १० डिसेंबर मतदान दि.१४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.








