Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हर घर दस्तक’ अभियानातंर्गत जिल्ह्यात 10 ते 30 नोव्हेंबर दरम्यान लसीकरण मोहिमेचे आयोजन

team by team
November 9, 2021
in आरोग्य
0
हर घर दस्तक’ अभियानातंर्गत जिल्ह्यात  10 ते 30 नोव्हेंबर दरम्यान लसीकरण मोहिमेचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे, संसर्ग वाढू नये तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादूर्भाव टाळण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी जिल्ह्यात 10 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ‘हर घर दस्तक’ अभियांनातंर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी केले आहे.

नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या या अभियानांतर्गत पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोस देण्यात येणार असून यासाठी आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभागासह इतर विभाग, लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी, सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. लसीकरणासाठी आरोग्य विभागाचे पथक जिल्ह्यातील प्रत्येक गाव, पाड्यातील घरोघरी जाऊन लसीकरण करणार आहेत. यासाठी आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यातील लसीकरण झालेल्या व लसीकरण न झालेल्या लाभार्थींची यादी तयार केली आहे. यात पहिला डोस, दुसरा डोस घेतलेले लाभार्थी तसेच स्थलांतरीत झालेल्या लाभार्थ्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय याद्या तयार करण्यात आल्या आहेत.

लसीकरणासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात, बँक, आठवडे बाजार, महाविद्यालय तसेच चेकपोस्टच्या ठिकाणी लसीकरणासाठी कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. तसेच दूसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना कॉलसेंटर मधून फोन करुन लसीकरणाबाबत कळविण्यात येणार आहे. नर्मदा काठावरील गावातील नागरिकांचे लसीकरणासाठी बोट ॲब्युलन्सच्या मदतीने लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यासाठी दवंडी देणे, गृहभेटी, सार्वजनिक ठिकाणी तसेच समाज माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. लसीकरणासाठी आरोग्य विभागाने व्यापक तयारी केली असून तालुकास्तरावर कोविशिल्ड आणि कोव्हक्सिन लसीचा मुबलक साठा उपलब्ध करुन दिला आहे.

लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी लोकप्रतिनिधींसह, जिल्हा परिषद व पंचायत समितीतील पदाधिकारी, शासकीय, निम शासकीय अधिकारी कर्मचारी, पत्रकार, सरंपच, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी नागरिकांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगून पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस तर एकही डोस न घेतलेल्या नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे. हर घर दस्तक अभियानात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरीकांनी सहभागी होऊन लसीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही श्रीमती खत्री यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आ. संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे आज कामबंद आंदोलन

Next Post

नंदुरबार येथे पोलीस भरतीसाठी रविवारी लेखी परीक्षा

Next Post

नंदुरबार येथे पोलीस भरतीसाठी रविवारी लेखी परीक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add