नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार ते वाकाचार रस्ता रस्त्यावर गुजरात राज्यातुन महाराष्ट्रात अवैध येणारा ३८ लाखाचा गुटखा उपनगर पोलीसांनी पकडला असुन १५ लाखाची आयशर गाडी ही जप्त करण्यात आली आहे.याप्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे.उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रकीया सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि.४ जलै रोजी पहाटे २.३० वाजता नंदुरबार ते वाकाचार रस्ता रस्त्यावर एक आयशर गाडी (क्र.एम.एच-१८, बी.जी- ३७४७) हिच्यात एक इसम विमल पान मसाला, गुटख्याची अवैद्य वाहतुक करणार असल्याची गुप्त बातमी मिळाल्यावरुन उपनगर पो.स्टेचे प्रभारी अधिकारी संदिप पाटील यांनी पथकास या बातमीप्रमाणे खात्री करुन कारवाई करण्यासाठी आदेश दिले.पथकाने वाकाचार रस्त्यावरील नाकाबंदीच्या ठिकाणी एका झाडाचे आड लपुन सदर गाडीवर पाळत ठेऊन होते.त्यांना साधारण पहाटे ४ वाजेचे सुमारांस बातमीप्रमाणे रस्त्याने एक आशयर गाडी (क्र-एम.एच-१८, बी.जी- ३७४७) हि रस्त्याने जाताना दिसल्याने त्यांनी तिस थांबवून रस्त्याच्या बाजुला लाऊन या गाडीची तपासणी करीत असतांना चालकाने पोलिसांना या गाडीत शेतकर्यांची ताडपत्री असल्याचे सांगुन पोलिसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांना मिळालेल्या बातमीप्रमाणे गाडीत खात्री करीत असतांना पोलिसांना एकुण ३८ लाख ३२ हजार ४०० रूपये किंमतीचा विमल पान मसाला,गुटखा मिळुन आला म्हणुन पोलिसांनी गुटखा व सुमारे १५ लाख रु.किं ची एक आयशर कंपनांची गाडी असा एकणु ५३ लाख ३२ हजार ४०० रुपये किंमतीचा माल जप्त करुन अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकार्यांना बोलाऊन वाहनावर व मालावर कारवाई करण्यास सांगीतल्याने कारवाई सुरु असुन.चालक गणेश चंपालाल पाटील रा म्हसवे , ता.पारोळा याला ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.सदरची कारवाई पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत,अप्पर पोलिस अधिक्षक विजय पवार,उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदिप पाटील. पोसई प्रशांत राठोड, असई शिवाजी काटकर , पोना निलेश पाटील, पोना योगेश निकम , पोना सुनिल येलवे, पोशि सुनिल राठोड यांच्या पथकाने केली आहे .