नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील कलाविष्कार प्रतिष्ठानतर्फे दिवाळीनिमित्त पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवावा या हेतूने विद्यार्थ्यासाठी दि.३० व ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे . ही कार्यशाळा १० वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी असून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे .
या कार्यशाळेत आकाशकंदील तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आयोजकांकडून परविण्यात येईल . संदर व आकर्षक प्रमाणपत्र आकाशकंदील बनविणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात येईल . कार्यशाळेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग देण्यात येईल . विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेला आकाशकंदील घरी नेता येईल . एका दिवशी २० विद्यार्थ्यांना प्रवेश असणार आहे . नेहरु पुतळ्याजवळील चित्रकला महाविद्यालयात कार्यशाळा घेण्यात येणार आहे , अशी माहिती कलाविष्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप देसले , सिद्धांत माळी , रविकिरण पाटील , महेश पाटील यांनी दिली .
मो.नं.वर नाव नोंदणीसाठी खालील आयोजकांशी संपर्क करावा प्रदिप देसले 8975685176, सिध्दांत माळी 9552482039, रविकीरण पाटिल (कार्यालय प्रमुख) 9975962538, महेश पाटिल सर 7798434408








