Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सातपुड्याच्या पायथ्याशी शेकडो हातांना मिळाला रोजगार, बांबूपासून बनविलेल्या आकर्षक वस्तू पोहचल्या बाजारात; झिरी बनतेय बांबूचे आगार

team by team
October 30, 2021
in सामाजिक
0
सातपुड्याच्या पायथ्याशी शेकडो हातांना मिळाला रोजगार, बांबूपासून बनविलेल्या आकर्षक वस्तू पोहचल्या बाजारात; झिरी बनतेय बांबूचे आगार
नंदुरबार | प्रतिनिधी
बांबू प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमाने स्थानिक परिसरातील हजारो शेतकर्‍यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत हरित सातपुडा मिशन पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्रात बांबू मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले राज्याचे माजीमंत्री तथा कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.पद्माकर वळवी यांनी  अतिदुर्गम सातपुड्यातील शेतकरी व बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने पाचशे शेतकर्‍यांना सभासद करून सातपुडा ग्रीन वेली ऍग्रिकल्चरल प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली होती. त्याअंतर्गत तळोदा तालुक्यातील झिरी येथे प्रत्यक्ष बांबू प्रक्रिया उद्योगाला सुरुवात झाली आहे. बांबूपासून विविध आकर्षक वस्तु तयार झाल्या असुन आकाश कंदील, लाईट लॅम्प तसेच विविध आकर्षक वस्तू बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहे.

राज्याचे माजीमंत्री तथा कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष  ऍड.पद्माकर वळवी यांनी  सातपुडा ग्रीन वेली ऍग्रिकल्चरल प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमाने परिसरातील स्थानिक ५०० शेतकर्‍यांना सभासद करून बांबू प्रक्रिया उद्योगाच्या पाया भरणीस प्रारंभ केला होता. या माध्यमाने संपूर्ण शेती क्षेत्राला कलाटणी मिळवून विना खर्चिक बांबूची शेती करण्याबाबत शेतकर्‍यांमध्ये जागृती निर्माण करुन त्यांना प्रोत्साहन दिले. यासाठी शेतकर्‍यांना बांबूचे पीक घेण्यासाठी या संस्थेमार्फत मोफत बांबूची रोपे वाटप करण्यात येणार आहे. बांबूची २ कोटी रोपे मोफत वाटण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. या संस्थेमार्फत परिसरातील महिला, तरुण कुशल व अकुशल कामगारांना घरबसल्या रोजगार प्राप्त होणार आहे. यामुळे आपोआपच कुटीर उद्योग विकसित होवून रोजगाराची निर्मिती होण्यास मदत होईल. यासाठी या उद्योगामार्फत संपूर्ण नियोजन करण्यात आले.
चार एकर क्षेत्रात बांबूची रोपे लावण्यात आली आहे. या अनुषंगाने ७० ते ७५ लाख बांबूंची रोपे येत्या वर्षभरात तयार होतील. ती रोपे शेतकर्‍यांना मोफत दिली जातील. त्यानुसार बांबू उद्योगाला लागणार कच्चा माल येत्या काळात या बांबूच्या शेतीतून मिळवून उद्योगाची क्षमता टप्प्याटप्प्याने वाढवता येणार आहे. बांबूचे बियाणे बाजारपेठेत हजार रुपये किलो भावाने मिळते. म्हणून गरीब शेतकर्‍यांना बांबूची रोपे तयार करण्यास अडचणीचे होत आहे. याचा विचार करून स्वतः उद्योगामार्फत बांबूची रोपे तयार करून शेतकर्‍यांना मोफत पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बांबू शेतीचे उत्पादन हे विनाखर्चीक आहे. एकदाची बांबूची रोपे लावली असता कोणतीही खेळ मशागत न करता बांबूचे पीक एका वर्षात शेतकर्‍याच्या हाती येते. एकदा शेतात लावणी केलेले बांबू सुमारे ५० ते ६० वर्षापर्यंत जिवंत राहतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा पेरणीचा खर्च वाचतो.बांबूपासून विविध वस्तू बनविण्यासाठी संस्थेमार्फत ५ अत्याधुनिक यंत्रे बसविण्यात आली आहे. याशिवाय ६ तंत्रज्ञ यांची सुद्धा नेमणूक करण्यात आली आहे. दि.१५ ऑक्टोंबर पासुन  तळोदा तालुक्यातील झिरी येथे ४० जणांना प्रशिक्षण देवुन त्यांच्यामार्फेत बांबूच्या प्रत्यक्षात उत्पादन कार्यास सुरुवात झाली.

सातपुडा ग्रीन वेली ऍग्रिकल्चरल प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून सुरु झालेल्या बांबू प्रक्रिया उद्योगात प्रत्यक्ष वस्तू निर्मितीला सुरुवात झाली असून भविष्यात सातपुड्यातील शेतकर्‍यांना व बेरोजगार व कुशल कामगारांना बांबू प्रक्रिया उद्योगातून मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या बांबू प्रक्रिया उद्योगातून पर्यावरणाचा समतोल राखला जात आहे. भविष्यात प्लास्टिक ला पर्याय म्हणून बांबू पासून तयार झालेल्या वस्तूला प्राधान्य दिल्यास सातपुडा ग्रीन व्हॅली ऍग्रिकल्चरल प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकरी व तरुणांना एक वेगळी ओळख मिळेल.
सातपुड्यातील जंगलात नैसर्गिक संपदा असलेल्या बांबूच्या झाडापासून स्थानिक शेतकरी व तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले बांबू मॅन माजी मंत्री ऍड. पद्माकर वळवी यांनी सातपुडा ग्रीन वेली ऍग्रीकल्चरल कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून मानवविकास कार्यक्रमांतर्गत बांबू प्रक्रिया उद्योगाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. कारागिरांकडून बांबूपासून सोफा, खुर्ची, आकाश कंदील, लाईट लॅम्प तसेच विविध आकर्षक वस्तू तयार करण्यात येत आहे. बांबू प्रक्रिया उद्योग निर्मितीसाठी लुपिन ह्युमन वेल्फेअर अ्ॅड रिसर्च फाउंडेशन व नाबार्डचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले आहे.
लक्ष्मण खोसे, कार्यक्रम व्यवस्थापक लुपिन फाउंडेशन.मानव विकास कार्यक्रमांतर्गत बांबू प्रक्रिया उद्योगाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. लुपिन फाउंडेशन व नाबार्डचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले असून याठिकाणी गेल्या पंधरा दिवसापासून ४० पेक्षा अधिक तरुण मुले-मुली व बचत गटाच्या महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षण काळात कारागिरांकडून बांबू पासून सोफा, खुर्ची, आकाश कंदील, लाईट लॅम्प तसेच विविध आकर्षक वस्तू तयार करण्यात येत असून बाजारात विक्रीसाठी दाखल करण्यात आल्या आहे. यामुळे परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध झाल्याने भविष्यात या कंपनीच्या माध्यमातून जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होईल.
प्रतिक्षा प्रकाश ठाकरे. प्रशिक्षणार्थी तळोदा

तळोदा तालुक्यातील झिरी येथील सातपुडा ग्रीन व्हॅली ऍग्रीकल्चर संस्थेच्या माध्यमातुन सातपुड्यातील युवक युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे.या संस्थेमार्फत परिसरातील महिला, तरुण कुशल व अकुशल कामगारांना घरबसल्या रोजगार प्राप्त होणार आहे. यामुळे आपोआपच कुटीर उद्योग विकसित होवून रोजगाराची निर्मिती होण्यास मदत होईल. यासाठी या उद्योगामार्फत संपूर्ण नियोजन करण्यात आले.चार एकर क्षेत्रात बांबूची रोपे लावण्यात आली आहे. या अनुषंगाने ७० ते ७५ लाख बांबूंची रोपे येत्या वर्षभरात तयार होतील. ती रोपे शेतकर्‍यांना मोफत दिली जातील. सर्वांना सोबत घेवुन सातपुड्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणार.
ऍड पद्माकर वळवी, माजी मंत्री

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे कलाविष्कार प्रतिष्ठानतर्फे आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळेचे आयोजन

Next Post

जिल्ह्यात 2 व 3 नोव्हेंबर रोजी लसीकरणासाठी विशेष शिबीराचे आयोजन :जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत मतदारांनी नाव नोंदवावे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री याचे आवाहन

जिल्ह्यात 2 व 3 नोव्हेंबर रोजी लसीकरणासाठी विशेष शिबीराचे आयोजन :जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add