Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील सरसावले , प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेवून सुचविल्या उपाययोजना

team by team
October 30, 2021
in सामाजिक
0
महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील सरसावले , प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेवून सुचविल्या उपाययोजना

नंदुरबार | प्रतिनिधी

महामार्गावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी येथील पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. अपघात टाळण्यासाठी  करण्यात येणार्‍या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस अधिकारी, उपप्रादेशिक परिवाहन अधिकारी यांची बैठक घेतली.
येथील पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या दालनात नंदुरबार जिल्हयातील अपघात प्रवण क्षेत्राबाबत नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग अभियंता, प्रादेशिक परिवहन अधिकारी, महामार्ग सुरक्षा पथक आदी विभागातील जिल्हयातील प्रमुखांची संयुक्तीकरित्या बैठक आयोजीत करण्यात आली होती.
सदर बैठकीत जिल्हयातील विविध रस्ते, राष्ट्रीय व महामार्गावरील वारंवार होणार्‍या अपघात घटनास्थळाबाबत चर्चा विनिमय करुन सदर ठिकाणी होणार्‍या अपघातातील जिवीतहानी व मालमत्तेच्या होणार्‍या नुकसानीबाबत करावयाच्या उपाययोजना संदर्भात व यापुढे अपघात होवुन होणारे जिवीत व वित्तहानी टाळण्याकरीता करण्यात येणार्‍या उपाय योजनांबाबत चर्चा करण्यात आली.
अपघात प्रवण क्षेत्रात जिवितहानी व मालमत्तेचे नुकसान टाळण्याकरीता दिशादर्शक फलक, स्पीड लिमीट बोर्ड, वळण रस्ता दर्शक फलक, रात्रीच्या वेळी अंधारात चमकणारे स्टड लावण्याबाबत त्याचप्रमाणे राज्य व राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्डयांची डागडुजी करुन रस्ते दुरुस्त करण्याबाबत संबधीत विभागांना सूचना देण्यात आल्यात.
सदर बैठक पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपअधीक्षक सचिन हिरे, श्रीकांत घुमरे, संभाजी सावंत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, एनएचआय पीआययू धुळेचे रविंद्र इंगोले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश कुलकणी, जि.प.बांधकाम अभियंता सोमनाथ पवार, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भावसार, महामार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.एम.काझी,  आदी अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

तहसिलदारांमुळे दिवाळी होणार गोड,११ हजार लाभार्थ्याच्या खात्यात २ कोटी ४५ हजार जमा

Next Post

जिल्हानिर्मितीनंतर पहिल्यांदाच शिक्षकांना मिळणार निवडश्रेणीचा लाभ

Next Post

जिल्हानिर्मितीनंतर पहिल्यांदाच शिक्षकांना मिळणार निवडश्रेणीचा लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add