नंदुरबार l प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्रात किमान तीन हजार रुपये उसाला दर द्या. प्रकाशा येथील ऊस परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.राजू शेट्टी यांची मागणी केली. ऊस परिषद आयोजीत करण्यात आली होती.यावेळीप्रमाणे एक रकमी दर मिळाला पाहिजे,कापसाचा भाव १२ हजार भाव मिळाला पाहिजे, पपई, व केळी ची दर आर्थिक लूट थांबवा, वीज वितरण विभागाची हुकूमशाही वर वचक आणावेत यासह ९ ठराव पारीत करण्यात आले.
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील दगाजी बापू धर्मशाळेच्या प्रांगणात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.खा.राजु शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्राची २ री भव्य ऊस परिषद आयोजीत करण्यात आली होती.

यावेळी उत्तर महाराष्ट विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी, सुभाष अहिरे, नाशिक जिल्हा अध्यक्ष रवींद्र इंगळे, उस्मानाबाद शिरूड येथील उद्धव आबाजी गुंजाळ, राजू शिरसाठ, जि.प.माजी.उपाध्यक्ष रामचंद्र दशरथ पाटील,गोगापूर येथील युवा अध्यक्ष रत्नदीप पाटील,राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ऊस परिषदेत एफआरपी प्रमाणे एकरक्कमी दर मिळाला पाहिजे.केंद्र सरकार व राज्य सरकार तीन टप्यात एफआरपी देण्याचा विचाराधीन आहे. त्याला आमचा विरोध आहे. कारखानदाराने मागील दोन वर्षापासून ऊसाची रिकवरीची चोरी करून १०.७५९ टक्यावरून ९.३९ टक्यावर आणली. ती रद्द करून १३ वर्षाची रिकवरी ११ टक्याप्रमाणे मिळाली पाहिजे. पपई व केळी या पिकाची व्यापार्यांकडून आर्थिक लुट थांबली पाहिजे. केळी उत्पादक शेतकर्यांना जळगांव, रावेर बोर्डाचा भरल्याभावाप्रमाणे शेतकर्यांना वजन काटयाप्रमाणे रोख पेमेंट मिळाले पाहिजे. एफसीआय योजनेतर्ंगत शासनाने खरेदी सुरू करून गह,ू ज्वारी, सोयाबीन भुसार पिकांची हमी भावाप्रमाणे खरेदी केली पाहिजे. वीज वितरण महाकंपनीचे हुकूमशाही पध्दतीने शेतकर्यांकडून होणारी वीज बिल व वीज कनेक्शन कट करणे बंद झाले पाहिजे. कापसाला १२ हजाराचा भाव मिळाला पाहिजे. सोयाबीनला १० हजाराचा भाव मिळाला पाहिजे. असे एकुन ९ ठराव ऊस परिषदेत पारीत करण्यात आले. यावेळी विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी म्हणाले की, सरकारच्या चुकीचा धोरण असुन शेतकरी शेवट पर्यंत लढा देणार आहे, प्रत्येक शेतकरीने रोखीने आपले शेती चे उत्पन्न रोखीने व्यापारीला विक्री करा, आता स्वाभिमानी संघटनेचे शेतकर्यांचा मोठे पाठबळ आहे, शेतकर्याचे राजकारण करून त्याचे भांडवल करून घेत आहेत, मात्र त्यांचे हित जोपासले जात नाही असे घनश्याम चौधरी यांनी सांगीतले
यावेळी मा.खा राजू शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी परिषद होणार की नाही ,असे काही गट द्विधा परिस्थतीत होता, मात्र आज या परिषदे मध्ये परिसरातील हजारो शेतकरी उपस्थीत आहेत, ऊस उत्पादकांच्या डोळ्या समीर साखर कारखाना विकला गेला आहे, संघटन नसल्याने शेतकरी संकटात सापडत आहे, सरकारचा चुकीचा धोरणाला हाणून पाडा, यंदा साखर उद्योजकांचा सुवर्णकाळ सुरू असून त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकर्यांना मिळाला हवा. केंद्र सरकारचा दोन विभागाचा समन्वयाचा अभावामुळे शेतकर्यांना फायद्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्यासोबत नुकसानग्रस्त शेतकर्यांचा मदतीसाठी राज्य सरकारकडून हात अखडता घेण्यात आला. तर केंद्र सरकारने एक हजार कोटीची मदत करतांनाच महाराष्ट्राबाबत सापत्नक वागणूक देण्यात येत आहे. निसर्गाने शेतकर्यांना देशोधडीला लावले असतांनाच विमा कंपन्यांनी शेतकर्यांना नुकसान भरपाई दिली नाही. अशा शेतकर्यांची फसवणूक करणार्या विम्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य सरकार शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अपयशी ठरले आहे.
उत्तर महाराष्ट्रातून ऊस गाळपातला रस साखर न बनवता गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर चोरट्या मार्गाने जात असल्याने उसाला दर दिला जात नसल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. चोर पकडण्यात आम्हाला रस नाही परंतु चोऱ्या संपवण्यासाठी शेतकरी संघटनेचा लढा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखर व इथेनॉल चे दरही वाढले असून शेतकऱ्यांना FRP द्यावीच लागेल. एफ आर पी आम्ही मिळवुच FRP न देणार्यांच्या नरड्या आम्ही दाबू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही जबाबदारीने एफ आर पी चे तुकडे करून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे परंतु FRP चे तुकडे करणा-याचा डाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हाणून पाडला आहे. देशात राजकीय टोळीयुद्ध सुरु असून आमचा लढा 43 साखर कारखाने शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
शेतकर्यांचा प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कायमच रस्त्यावर उतरते. शेतकर्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कायदा हातात घेण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही. असे माजी खा. राजु शेट्टी यांनी सांगितले. यावेळी ऊस परिषदेला उत्तर महाराष्ट्रातून कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.








