येथील स्मित मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटलमध्ये जिल्ह्यातील पहिली हायपोपेडीयासिस (मुत्रमार्ग) शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली. सदरची शस्त्रक्रिया ही १० वर्षाच्या मुलावर करण्यात आली. या रोगात लहान मुलांचे मुत्रमार्ग नेहमीच्या ठिकाणी नसणे, जन्मजात वाक असणे व छिद्र योग्य जागेवर नसल्याने वारंवार व अनियंत्रित लघवी होणे इत्यादी समस्या असतात. शस्त्रक्रियेद्वारे हे सर्व नैसर्गिकरित्या असते त्याप्रमाणे करण्यात डॉक्टर यशस्वी झाले. स्मित हॉस्पीटल येथे सर्व प्रकारच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया कायमस्वरुपी होत असून सदरची शस्त्रक्रिया ही महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत मोफत करण्यात आली.
शहरातील स्मित मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटल हे रुगणांना सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे हा उद्देश ठेवून सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी विविध सुपरस्पेशलिटी उपचार उपलब्ध असून त्यासाठी आवश्यक असणारे तज्ञ डॉक्टर्स व आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असून अल्पावधितच जिल्ह्यातील नागरीकांनी स्मित हॉस्पीटलमध्ये विविध उपचारांचा लाभ घेतला आहे. या हॉस्पीटलमध्ये आधुनिक उपकरणांनी सुसज्ज तीन शस्त्रक्रिया कक्ष उभारण्यात आले आहे. नंदुरबार येथील नामवंत सर्जन डॉ.विजय पटेल यांच्या देखरेखीखाली सदर मुलास ऍडमीट करण्यात आले होते. धुळे येथील लहान मुलांचे सर्जन डॉ.प्रथमेश मोरे, सर्जन डॉ.सचिन कुटे तसेच भुलतज्ञ डॉ.अंकुश परदेशी या चमुने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. या ठिकाणी सर्व शस्त्रक्रिया कॅशलेस असून सर्वच इन्शुरन्स कंपनीचे कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत.








