नंदुरबार | प्रतिनिधी –
शहादा तालुक्यातील कळंबू येथे आज दि.२८ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ वाजुन ५८ मिनीटांनी भुकंपाचे सौम्य धक्के बसले सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही. या भुकंपाची तीव्रता २.३ रिक्टर स्केल इतकी होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, कळंबू ता. शहादा येथे आज दि.२८ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ वाजुन ५८ मिनीटांनी २.३ रिक्टर स्केलचे धक्के बसले. भुकंपाचे केंद्र ९२ किलोमिटर वर असलेल्या सरदार सरोवरात १३.९ किमी वर होते. याबाबत प्रशासनाने दुजोरा दिला असुन सुदैवाने कुठलीही जिवीत हाणी झाली नसल्याचे कळविले आहे. भुकंपाबाबतची माहिती सिस्मॉलॉजिकल रिसर्च, गांधीनगर यांनी दिली आहे.








