Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आयकर आणि ईडी कार्यकर्ते असल्यासारखे वागत असुन महाराष्ट्रात सध्या राजकीय टोळी युद्धसुरु असल्याने शेतक़र्‍यांची वाताहात झाली : मा.खा.राजु शेट्टी

team by team
October 28, 2021
in राजकीय
0
आयकर आणि ईडी कार्यकर्ते असल्यासारखे वागत असुन महाराष्ट्रात सध्या राजकीय टोळी युद्धसुरु असल्याने  शेतक़र्‍यांची वाताहात झाली : मा.खा.राजु शेट्टी

नंदुरबार | प्रतिनिधी –

आयकर आणि ईडी कार्यकर्ते असल्यासारखे वागत असुन महाराष्ट्रात सध्या राजकीय टोळी युद्धसुरु असल्याने  शेतक़र्‍यांची वाताहात होत आहे. त्यांचे प्रश्न बाजुला पडुन,  सगळ्या महाराष्ट्राला एकच प्रश्न पडला आहे कि आर्यन खानला जामीन कधी होणार आणि समीर वानखेडेवर नेमकी कारवाई काय होणार , बाकीचे प्रश्न किरकोळ वाटत असल्याने याला केंद्र आणि राज्यातील सत्तेत असलेले चारही पक्ष जबाबदार असल्याचा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.खा.राजु शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे दुसरी ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मा.खा.राजु शेट्टी नंदुरबार दौर्‍यावर होते.त्याप्रसंगी शहरातील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संबाद साधला त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी श्री.शेट्टी म्हणाले की, आमच्यावर संस्कार असल्याने येणारी पिढी व्यसनाधिन व्हावी आम्हाला अस वाटत नाही त्यामुळे सधन होण्यासाठी गांजा लागवड करण्याची परवानगी मागण्याचा आतेताई पणा आम्ही करणार नाही. मात्र शेतकरी गांजा लागवड करण्यासाठी का परवानगी मागत आहे याचा शासनाने अंतर्भुत विचार करण्याची गरज असल्याचे राजु शेट्टी यांनी सांगितले.  फालतु बडबड करणा़र्‍या लोकांकडे मी लक्ष देत नाही. माझ्या हाकेवर लाखो शेतकरी रस्त्यावर येतात  यांचा तथाकथीत शेतकरी नेत्यांनी अंतर्मुख होवुन  विचार करावा,त्यांच्या हाकेला शेतकरी धावुन का येत नाही याच त्यांनी आत्मपरिक्षण देखील  करावे असा सदाभाऊ खोत यांचे नावे न घेता त्यांना शेट्टी यांनी टोला लगावत मी कोण्या आमक्या बरोबर आहे किवां नाही या पेक्षाही मी फक्त शेतक़र्‍यांसोबत आहे असे सांगितले.  शेतक़र्‍यांच्या वीज कंपनीकडुन वीज कनेक्शन कापल्याजात असल्याविरोधात त्यांनी आक्रमक भुमिका घेत स्वाभीमानी या प्रश्न रस्त्यावर उतरुन वेळ प्रसंगी शेतक़र्‍यांच्या संरक्षणासाठी कायदा हातात घेण्याची भुमिका जाहीर केली आहे. असे यावेळी  राजु शेट्टी यांनी सांगीतले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ झाला जाहीर, या असतील सवलती

Next Post

कळंबू येथे बसले भुकंपाचे सौम्य धक्के

Next Post
कळंबू येथे बसले भुकंपाचे सौम्य धक्के

कळंबू येथे बसले भुकंपाचे सौम्य धक्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add