Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ झाला जाहीर, या असतील सवलती

team by team
October 28, 2021
in कृषी
0

नंदुरबार l प्रतिनिधी

शासन निर्णय व दुष्काळ व्यवस्थापन संहितेमध्ये विहित केलेल्या निकषानुसार खरीप २०२१ च्या हंगामातील परिस्थितीच्या आधारे राज्यातील ८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची दुसरी कळ लागू झाली . या तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पिकांचे नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्या आधारे राज्य शासनाने नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार या तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.

राज्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती . शासन निर्णय : राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट , उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता , दूरसंवेदन विषयक निकष , वनस्पती निर्देशांक , मृदू आर्द्रता , पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेवून राज्य शासन नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार या तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ घोषित करण्यात येत असलेल्या नंदुरबार तालुक्यामध्ये खालील सवलती लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात दिली.
यात जमीन महसूलात सूट , पिक कर्जाचे पुनर्गठन , शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५ टक्के सूट . शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी . रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता . आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर . टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे .
या आदेशान्वये देण्यात येणाऱ्या विविध सवलतीपोटींचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा . त्यानुसार या प्रकरणी पुढील उचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल या विभागास सादर करण्यात यावा . सदर तालुक्यातील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान अनुज्ञेय राहील . सदर निविष्ठा अनुदान हे कोरडवाहू पिक उत्पादित केलेल्या व ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या खातेदारांना अनुज्ञेय राहील . निविष्ठा अनुदान देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करताना शासन निर्णय दि.३. नोव्हेंबर २०१५ मधील परिच्छेद क्रमांक १४ मध्ये विहित केलेली कार्यपध्दती अवलंबिण्यात यावी . निविष्ठा अनुदानाचे दर व इतर अटी व शर्ती या शासन निर्णय , महसूल व वन विभाग दि. १३ मे , २०१५ मध्ये नमूद केल्यानुसार राहतील . तसेच निविष्ठा अनुदान हे नुकसान झालेल्या प्रत्यक्ष पीक पेरणी केलेल्या क्षेत्रापुरतेच मर्यादित राहील याची दक्षता घ्यावी . सदर मदतीचे वाटप सन २०२१ च्या खरीप हंगामातील ७/१२ मधील पिकांच्या नोंदीच्या आधारे करण्यात 2/3, हंगामातील अंतिम पैसेवारीसाठी करण्यात आलेल्या पिक कापणी प्रयोगाअंती आलेल्या पिक निहाय पैसेवारीच्या आधारे कोरडवाहू पीकांचे ३३ टक्के नुकसान ठरविण्यात यावे . प्रमुख पिक नसलेल्या व पिक कापणी प्रयोग न केलेल्या कोरडवाहू पिकांना सुध्दा मदत अनुज्ञेय राहील . बहुवार्षिक फळपिके व बागायती पिके यांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याची शहानिशा शेतीनिहाय पंचनामे करून करण्यात यावी . बहुवार्षिक फळपिके व बागायती पिकांचे नुकसान ठरविण्याचा निकष ७ / १२ मधील नोंद हा असेल . नुकसानीची तीव्रता ठरविण्यासाठी पंचनामा हा निकष असेल . बहुवार्षिक फळपिके व बागायती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी त्याची नोंद ७/१२ मध्ये असणे आवश्यक आहे . सन २०२१ च्या खरीप हंगामातील पिक पाहणी मधील पिकांच्या ७/१२ मधील उताऱ्यातील नोंदीबाबत कोणताही आक्षेप उद्भवल्यास त्याचे निराकरण महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमधील तरतूदीनुसार करण्यात यावे . दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यामधील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना दिर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबविण्यात यावी . तसेच मध्यान्ह भोजन योजना व एकात्मिक बालविकास योजनेतंर्गत ( ICDS ) मुलांना पौष्टीक अन्न देण्यात यावे . सदरहू आदेश हे प्रशासकीय मान्यतेचे असून निधी वितरणाबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील . दुष्काळ घोषित केल्याचे आदेश दि. १ डिसेंबर २०२१ पासून अंमलात येतील व शासनाने हे आदेश रद्द केल्यास पुढील ६ महिन्यांच्या कालावधी पर्यंत लागू राहतील . संबंधित जिल्हाधिकारी यांनी दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यामध्ये आवश्यक उपाययोजना अंमलात आणाव्यात असे शासन निर्णयात म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार- भालेर वाहतुकीस अडथळा ठरणारा ‘तो’ ट्रक काही तासातच पोलीस ठाण्याच्या कंपाउंड मध्ये हलवला

Next Post

आयकर आणि ईडी कार्यकर्ते असल्यासारखे वागत असुन महाराष्ट्रात सध्या राजकीय टोळी युद्धसुरु असल्याने शेतक़र्‍यांची वाताहात झाली : मा.खा.राजु शेट्टी

Next Post
आयकर आणि ईडी कार्यकर्ते असल्यासारखे वागत असुन महाराष्ट्रात सध्या राजकीय टोळी युद्धसुरु असल्याने  शेतक़र्‍यांची वाताहात झाली : मा.खा.राजु शेट्टी

आयकर आणि ईडी कार्यकर्ते असल्यासारखे वागत असुन महाराष्ट्रात सध्या राजकीय टोळी युद्धसुरु असल्याने शेतक़र्‍यांची वाताहात झाली : मा.खा.राजु शेट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add