नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यासमोर पोलीसांनी पकडलेला ट्रक गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर उभा होता. त्यामुळे नागरीकांना मोठया प्रमाणावर रहदारीस अडथळा निर्माण होत होता.याबाबत नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडत पब्लिक मिरर न्युजने बातमी प्रकाशीत केली होती,त्याची नंदुरबार पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी दखल घेत त्यांच्या आदेश दिल्याने काही तासातच रहदारीस अडथळा ठरणारा ट्रक हलवीत तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात लावला. पोलीस अधिक्षकांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण केलाच आहे.मात्र सामान्य नागरिकांच्या समस्यांबाबत तात्काळ कारवाई करत संवेदनशिल अधिकारी असल्याचाही परिचय दिला आहे.



नंदुरबार शहरापासून दिड कि.मी. अंतरावर नंदुरबार-भालेर रस्त्यावर नंदुरबार तालुका पोलीस ठाणे स्थलांतर झाले आहे. त्याठिकाणी तालुका पोलीसांनी एका ट्रकवर कारवाई ती पकडली होती. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस ठाण्यासमोरून जाणार्या नंदुरबार भालेर रस्त्यावर ही ट्रक उभी आहे. नंदुरबार ते भालेर रस्त्यावर दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे मोठया प्रमाणावर नागरीकांची या वाहनामुळे गैरसोय होतांना दिसत आहे. या उभ्या असलेल्या ट्रकमुळे अपघात होण्याची शक्यता होती.याबाबत याबाबत नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडत पब्लिक मिरर न्युजने बातमी प्रकाशीत केली होती.नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर विविध गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या त्यानंतर कोंबीग ऑपरेशनच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारांवर कारवाई केली. यासोबतच सर्वसामान्यांचे समस्या सोडवीण्याकडे त्यांचा कल आहे. पोलीसांनी पकडलेला ट्रक गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर उभा होता. त्यामुळे नागरीकांना मोठया प्रमाणावर रहदारीस अडथळा निर्माण होत होता.याबाबत नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडत पब्लिक मिरर न्युजने बातमी प्रकाशीत केल्यानंतर या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी सर्वसामान्य नागरीकांना त्रास होवु नये यासाठी तात्काळ सुचना दिल्या.त्यानंतर नंदुबार तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश चौधरी यांनी याबाबत कर्मचार्यांना सुचना दिल्या.अनेक दिवसांपासुन ट्रक उभा असल्याने बॅटर्या डिस्चार्ज झाल्या होत्या.त्यांनी गावातील गॅरेजमधुन बॅटर्या आणल्या त्या बसवल्यानंतर एका ट्रक चालकाला थांबवुन त्याच्या सहाय्याने रस्त्यावर उभा असलेला ट्रक नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात लावला.घटनेची माहिली मिळताच कर्तव्य दक्ष पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी शेकडो नागरीकांना होणारा त्रासातुन मुक्त करत कर्तव्य दक्षतेसोबतच संवेदनशिल अधिकारी असल्याचाही परिचय दिला.








