पन्नास टक्के रक्कम भरुन शेतकर्यांचा वीजपुरवठा पुर्ववत सुरु ठेवण्याचे आदेश महावितरणला देण्यात यावेत, अन्यथा भाजपातर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आ.राजेश पाडवी यांनी दिला आहे.
याबाबत आ.राजेश पाडवी यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारी, अतिवृष्टी/ओला दुष्काळ, वादळ, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले असून आता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करून जबरी वसुली सुरु केली आहे.त्यामुळे शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
वीज कनेक्शन खंडित केल्यामुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकर्यांनी आत्महत्या केली तर त्याला विद्युत वितरण कंपनी कारणीभूत असेल. पन्नास टक्के रक्कम शेतकरी भरावयास तयार असून तेवढी रक्कम भरून उर्वरित रक्कम नंतर हप्त्याने भरावयास तयार आहेत आपल्या माध्यमातून ५० टक्के रक्कम भरून वीजपुरवठा पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश महावितरण कंपनीला द्यावेत, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा आ.पाडवी यांनी दिला आहे.








