नंदुरबार l प्रतिनिधी
पिरामल स्वास्थ्य संस्थेतर्फे जिल्ह्यासाठी 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र प्राप्त झाले आहेत. पिरॅमल स्वास्थचे जिल्हा परिवर्तन अधिकारी निलचंद्र शेंडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे हे यंत्र सूपुर्द केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण उपस्थित होते. पिरॅमलतर्फे देण्यात आलेले हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र तालुकास्तरावर वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.








