Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ऊसाच्या शेतात आढळली गांजाची झाडे ८७ हजार ८२५ रुपयांच्या मुद्देमालासह एकास अटक

team by team
July 4, 2021
in क्राईम
0
ऊसाच्या शेतात आढळली गांजाची झाडे ८७ हजार ८२५ रुपयांच्या मुद्देमालासह एकास अटक

नंदुरबार | प्रतिनिधी-

मोदलपाडा येथील ऊसाच्या शेतात ८७ हजार ८२५ रुपये किमतीची गांजाची १६ झाडे आढळून आली. याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तळोदा तालुक्यातील रामपूर गावाजवळ सतोना गाव शिवारात रेसा नदर्‍या पाडवी याने त्याच्या ऊसाच्या शेतात बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती स्थाानिक गुन्हा अन्वेषाणा शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाली होती. त्यानुसार रविंद्र कळमकर,  तळोदा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अविनाश केदार व पथकाने सतोना गावात सापळा रचला. तेथे ६ ते ७ फुट उंचीचे ऊसाचे पिक व एका शेतात एक इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आले. रेसा नदर्‍या पाडवी रा.रामपूर पो.मोदलपाडा ता.तळोदा असे त्या इसमाचे नाव होते. रेसा पाडवी याच्या ऊसाच्या पिकाची पाहणी केली असता शेताच्या आतील बाजुस ठिकठिकाणी ५ ते ६ फुट उंचीचे हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संपुर्ण दीड एकर शेती पिंजुन काढली असता तेथे ८७ हजार ८२५ रुपये किंमतीची एकुण १६ गांजाची झाडे मिळून आली. संशयीत रेसा नदर्‍या पाडवी व त्याच्या शेतात मिळून आलेली गांजाची झाडे पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.
रेसा नदर्‍या पाडवी याने त्याच्या मालकीच्या शेतात ऊसाच्या पिकामध्ये बेकायदेशीररीत्या गांजाच्या झाडांची लागवड केली म्हणून त्याच्याविरुध्द् गुंगीकारक औषध द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-१९८५ अन्वये तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व जागा लढवणार:अनिल गोटे

Next Post

तोरणमाळ येथे जाणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल

Next Post

तोरणमाळ येथे जाणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add