Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

घराच्या छतावर तलवारींचा साठा; नंदुरबार सात धारदार तलवारी जप्त

team by team
August 10, 2026
in क्राईम
0
घराच्या छतावर तलवारींचा साठा; नंदुरबार सात धारदार तलवारी जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील चिराग गल्ली परिसरात घराच्या छतावर लपवून ठेवलेल्या सात धारदार व टोकदार तलवारी स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून जप्त केल्या. या कारवाईत तब्बल २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, अदनान खान सफदर खान पठाण (वय ३०, रा. चिराग गल्ली, नंदुरबार) याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना नंदुरबार शहरातील चिराग गल्ली परिसरात अदनान खान सफदर खान पठाण याच्या राहत्या घराच्या छतावर धारदार लोखंडी तलवारी बेकायदा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांच्या पथकाने दोन पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला.

यावेळी आरोपीच्या घराच्या छतावर असलेल्या कबुतरखान्याच्या बाजूला पाण्याच्या टाकीच्या आडोशाला एकूण सात लोखंडी धारदार व टोकदार तलवारी लपवून ठेवलेल्या आढळून आल्या. पोलिसांनी या सर्व तलवारी ताब्यात घेतल्या. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २४ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

शहरातील वर्दळीच्या परिसरात अशा प्रकारे धारदार शस्त्रे लपवून ठेवण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तलवारी नेमक्या कोणत्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आल्या होत्या, याबाबत पुढील तपासात माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी अदनान खान सफदर खान पठाण याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

कारवाई पथक
पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चित्ते, जितेंद्र पाडवी, सुनील येलवे, चेतन साळवे, पोलीस शिपाई मनोज महाजन, विनोद पाटील, रामेश्वर चव्हाण, हेमंत बारी, कल्पेश मोरे, अभय राजपूत तसेच महिला पोलीस शिपाई रोहिणी धनगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

Next Post

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

Next Post
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add